‘आस’ शिक्षक संघटनेतर्फे चर्चासत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:21 IST2021-06-25T04:21:59+5:302021-06-25T04:21:59+5:30
या चर्चासत्रासाठी शहादा तालुक्यातील ऑनलाइन, ऑफलाइन शिक्षणात भरीव कामगिरी केलेले उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षक अमृतसिंग राजपूत, सचिन पत्की व ...

‘आस’ शिक्षक संघटनेतर्फे चर्चासत्र
या चर्चासत्रासाठी शहादा तालुक्यातील ऑनलाइन, ऑफलाइन शिक्षणात भरीव कामगिरी केलेले उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षक अमृतसिंग राजपूत, सचिन पत्की व मनोज पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते. अमृतसिंग राजपूत यांनी आपले अनुभव मांडले. त्यांनी ई-कन्टेन्टचे ऑनलाइन, ऑफलाइन शिक्षणात असलेले महत्त्व पटवून दिले. कोरोना काळात ऑनलाइन, ऑफलाइन शिक्षणात त्यांनी स्वतः ई-कन्टेन्ट तयार करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले. ऑनलाइन, ऑफलाइन शिक्षणात इतर माध्यमदेखील त्यांनी वापरून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवली. सचिन पत्की यांनी आपले अनुभव मांडताना शैक्षणिक डिजिटल बॅनर तयार करून शाळेत व संपूर्ण गावात लावले. याविषयी गावातील लोकांच्या प्रतिक्रिया त्यांनी सांगितल्या. लसीकरण जनजागृती मोहिमेत वेगवेगळ्या वेशभूषा करून जनजागृतीही त्यांनी केली होती. मनोज पाटील यांनी आपले अनुभव सांगताना शिक्षक हा लोकशिक्षक असतो हे पटवून दिले. कोरोना काळात ऑनलाइन, ऑफलाइन शिक्षण कसे महत्त्वाचे आहे, त्याबरोबर त्याचे दुष्परिणामांविषयी त्यांनी भाष्य केले. आस शिक्षक संघटनेचे राज्य सल्लागार सुनील चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी डोंगरगाव केंद्रातील कामरावद शाळेचे शिक्षक महेंद्र वाघ यांनी लसीकरणावर आधारित गीत सादर केले. कवठळ त. श. गावात १०० टक्के लसीकरण घडवून आणण्यात मोलाचे काम करणारे मुख्याध्यापक वसंत कोळी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. आस शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र सोनवणे यांनी संघटनेची पुढील वाटचाल कशी असेल याविषयी माहिती दिली. सूत्रसंचालन भरत आखडमल यांनी, तर आभार राहुल पाटील यांनी मानले. चर्चासत्रासाठी सुनील चव्हाण, अनिल सोनवणे, किशोर महाले, बन्सीलाल सोनार आदींनी परिश्रम घेतले.