गर्दी टाळण्यासाठी चार ठिकाणी भाजीपाला विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 14:28 IST2020-03-25T14:27:58+5:302020-03-25T14:28:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव बघता रविवारी जनता कर्फ्यूला प्रचंड प्रतिसाद देत घरात थांबलेल्या नागरिकांनी ...

Sell vegetables in four places to avoid congestion | गर्दी टाळण्यासाठी चार ठिकाणी भाजीपाला विक्री

गर्दी टाळण्यासाठी चार ठिकाणी भाजीपाला विक्री

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव बघता रविवारी जनता कर्फ्यूला प्रचंड प्रतिसाद देत घरात थांबलेल्या नागरिकांनी सोमवारी घराबाहेर पडत रस्त्यांवर गर्दी केली होती. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने संपूर्ण राज्यात संचारबंदी लावण्यात आली. संचारबंदी आदेश असतानाही मंगळवारी पुन्हा शहरातील मुख्य भाजी मार्केटमध्ये भाजीपाला खरेदीसाठी शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावर तोडगा काढण्यासाठी प्रशासन व भाजीपाला विक्रेते व्यापारी यांच्यात बैठक घेण्यात आली.
राज्यात सचारबंदी लागू असतानाही जीवनावश्यक वस्तूंमध्ये मोडणाऱ्या भाजीपाला मार्केटमध्ये दोन दिवसापासून भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत होती. त्यातच काही विक्रेते चढ्या दराने भाजी विक्री करीत असल्याची चर्चा होती. त्यामुळे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन होत असल्याने प्रशासनाच्यावतीने पालिकेत नगराध्यक्षांच्या दालनात व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या वेळी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे, उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, मुख्याधिकारी डॉ.राहुल वाघ, पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, कार्यालय अधीक्षक माधव गाजरे, पालिकेचे गटनेते मकरंद पाटील, नगरसेवक संदीप पाटील, नाना निकम, प्रशांत निकुभे, वाहीद पिंजारी, माजी उपनगराध्यक्ष अरविंद कुवर, एकनाथ नाईक, अरविंद कुवर, भाजीपाला व्यापारी असोसिएशनचे दशरथ चौधरी, युसूफ बागवान व पदाधिकारी, सर्व विभागांचे विभाग प्रमुख व व्यापारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी प्रांताधिकारी डॉ.गिरासे यांनी व्यापाºयांना मार्गदर्शन केले. त्यात कोरोना हा भयंकर व्हायरस असून त्याचा अटकाव करण्यासाठी आपल्या सर्वांनाच प्रयत्न करावे लागतील. संपूर्ण शहरासाठी एकच भाजी मंडी असल्याने त्याठिकाणी भाजी खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. गर्दी होऊ नये म्हणून चार ठिकाणी तात्पुरते भाजीपाला विक्रीचे केंद्र वेळेच्या बंधनासह निश्चित करण्यात आले. त्यासाठी जिल्हाधिकाºयांच्या अंतिम आदेशानुसार कारवाई केली जाणार आहे. विक्रेते व व्यापाºयांनी शहरातील चार ठरवून दिलेल्या वेगवेगळ्या ठिकाणी आपली भाजीपाल्याची दुकाने लावावीत, असे आवाहन करण्यात आले. शहरातील प्रेस मारुती मैदान, डोंगरगाव रोड, पाडळदा चौफुली, कुकडेल परिसर, आणि मुख्य भाजी मार्केट या वेगवेगळ्या भागात दुकाने लावण्याचे सांगण्यात आले. तसेच भाजी विक्रीसाठी प्रशासनाच्या वतीने ठरवण्यात आलेल्या वेळेतच विक्रेत्यांना दुकाने उघडून भाजीपाला विकावा लागेल. या नियमांचे पालन न करणाºया व जीवनावश्यक वस्तूंचा अवैध साठा करणाºया विक्रेत्यांवर प्रशासनाच्यावतीने कडक कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.
व्यापारी विक्रेते संघटनेच्यावतीनेही प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत करून सर्व विक्रेत्यांना शहरातील ठरवून दिलेल्या ठिकाणी ठरवून दिलेल्या वेळेतच भाजीपाला विक्रीचे सांगण्यात येईल, असे सांगण्यात आले.
शहरात कोणीही विनाकारण फिरू नये, प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेव्यतिरिक संचारबंदीचे काटेकोर पालन करावे, विनाकारण संचार करून गर्दी करू नये, महत्वपूर्ण कामासाठी ओळखपत्राशिवाय फिरू नये अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल अशा इशारा पोलिस निरीक्षक किसन नजनपाटील यांनी या बैठकीत दिला.

Web Title: Sell vegetables in four places to avoid congestion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.