दोन राज्यांच्या सीमेवरचे नवापूर रेल्वे स्थानक बनले सेल्फी पाईंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 13:05 IST2019-05-05T13:04:47+5:302019-05-05T13:05:08+5:30

आय़जी़पठाण ।  लोकमत न्यूज नेटवर्क नवापुर : ‘हिंद देश के निवासी सभी जन एक है, रंग रुप वेष-भूषा सब ...

Selfpiece points to be built at Navapur railway station on the border of two states | दोन राज्यांच्या सीमेवरचे नवापूर रेल्वे स्थानक बनले सेल्फी पाईंट

दोन राज्यांच्या सीमेवरचे नवापूर रेल्वे स्थानक बनले सेल्फी पाईंट

आय़जी़पठाण । 
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापुर : ‘हिंद देश के निवासी सभी जन एक है, रंग रुप वेष-भूषा सब चाहे अनेक है, बेला, गुलाब, जुही, चंपा, चमेली प्यारे प्यारे फुल गुंथे माला मे एक है’ अशी देशाची विविधता सांगणारी कविता सर्वश्रुत आह़े विविधतेत एकात्मतेचा संदेश देणा:या या कवितेचा अनुभव नवापुर रेल्वेस्थानकात येतो़ या विविधतेचा अनुभव गुजरात आणि महाराष्ट्र या दोन राज्याची सीमारेषा भेदून जाणा:या नवापुर रेल्वेस्थानकावर येत आह़े हा अनुभव आता सेल्फीतून कैद होत असून रेल्वेस्थानकावरची सीमारेषा सेल्फी पॉईंट बनले आह़े 
1 मे 1960 रोजी गुजरात आणि महाराष्ट्र ही दोन्ही स्वतंत्र राज्यांची निर्मिती झाली़ तत्कालीन धुळे जिल्हा आणि गुजरात राज्यातील सुरत जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या नवापूर शहर आणि तालुक्यात या विभाजनाची चर्चा होतीच़ रंगावली नदीच्या काठावर वसलेले नवापूर शहर व विविधतेने नटलेला तालुका  नेमका कोणत्या राज्यात समाविष्ट होणार याबाबत उत्सुकता होती़ परंतू नवापूर परिसर महाराष्ट्रात समाविष्ट झाला़ यानंतर मात्र नवापूर रेल्वेस्थानकाचा प्रश्न होता़ तत्कालीन गुजरात आणि महाराष्ट्र सरकारच्या संमतीने तयार झालेल्या  सिमारेषेवर रेल्वेस्थानक आल्याने स्थानकाच्या मधूनच रेषा आखून देण्यात आली़ देशाच्या वेगळेपणात भर घालणारं हे रेल्वेस्थानक पाहण्यासाठी आता पर्यटक येथे गर्दी करत असून दोन राज्यांची सिमा असलेला बाक सेल्फी पॉईंट बनला आह़े केवळ रेल्वेनेच नव्हे, तर नवापूरात कामानिमित्त तसेच लगतच्या आहवा डांग परिसराला भेट देणारेही या स्थानकाला भेटी देत असून तेथे सेल्फी घेण्याचा मोह त्यांना घेऊन येत आह़े गेल्या वर्षभरात सेल्फीप्रेमी याठिकाणी सातत्याने येत असल्याची माहिती स्थानकातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी दिली आह़े 
युवकांमध्ये येथे सेल्फी काढण्याची मोठी क्रेझ पाहवयास मिळत आह़े बाकावर बसल्यानंतर सेल्फी घेत तात्त्काळ सोशल मिडियात अपलोड केले जात़े पॅसेंजर किंवा मेल येथे थांबवल्यावर प्रवासी सेल्फीसाठी धाव घेतात़

Web Title: Selfpiece points to be built at Navapur railway station on the border of two states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.