जिजामाता महाविद्यालयात विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 12:35 IST2020-02-09T12:35:35+5:302020-02-09T12:35:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील जिजामाता महाविद्यालयात युवती सभेंतर्गत स्वंयसिद्धा अभियान या योजनेद्वारे विद्यार्थिनींमध्ये स्वसंरक्षणार्थ जागृती निर्माण करून ...

जिजामाता महाविद्यालयात विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील जिजामाता महाविद्यालयात युवती सभेंतर्गत स्वंयसिद्धा अभियान या योजनेद्वारे विद्यार्थिनींमध्ये स्वसंरक्षणार्थ जागृती निर्माण करून त्यांना कार्यशाळेत प्रशिक्षण देण्यात येत आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ.टी.ए. मोरे यांनी केले.
कार्यशाळेत ११ फेब्रुवारीपर्यंत ६० विद्यार्थिनींना स्वसंरक्षण करता यावे, तसेच त्यांच्यात आत्मविश्वास वाढावा यासाठी ज्युडो आणि कराटेचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. कराटे प्रशिक्षक म्हणून संतोष मराठे, पवन बिºहाडे हे काम पहात आहेत.
प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डी.व्ही. सोनवणे, प्रा.अनिकेत पटेल यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संजय महाले तर आभार प्रा.एस.पी. भसारकर यांनी मानले.
कार्यक्रमासाठी दिनेश शहा, कल्याणी मराठे, आदी परिश्रम घेत आहेत. या वेळी विद्यार्थिनींसह प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.