शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

जिल्ह्यात स्वच्छतेच्या जागृतीसाठी कलापथकांची निवड चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 2:50 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात शाश्वत स्वच्छतेविषयी जाणीवजागृतीसाठी कलापथकांची मदत घेण्यात येणार आहे. कलापथकांची ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात शाश्वत स्वच्छतेविषयी जाणीवजागृतीसाठी कलापथकांची मदत घेण्यात येणार आहे. कलापथकांची निवड करण्यासाठी जिल्हा परिषदेत आज सादरीकरण करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्षा अ‍ॅड. सीमा वळवी, उपाध्यक्ष अ‍ॅड.राम रघुवंशी यांच्या हस्ते व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रतन पाडवी, अभिजीत पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भूपेंद्र बेडसे, डॉ. वर्षा फडोळ, शिक्षणाधिकारी एम. व्ही. कदम आदींसह विभाग प्रमुख उपस्थित होते.सादरीकरणात जिल्ह्यातील एकूण नऊ कलापथकांना निमंत्रित करण्यात आले होते. पैकी सात कलापथक सादरीकरणासाठी उपस्थित होते. सादरीकरणासाठी जिल्ह्यातील प्रेमानंद बहुद्देशीय कलापथक देऊन तालुका शहादा, युवारंग कलापथक नंदुरबार, आपकी जय कलापथक अंमलपाडा तालुका तळोदा, एकलव्य कलापथक धडगाव, जय आदिवासी कलापथक अक्कलकुवा, आदिवासी जनजागृती कलापथक लोय ता. नंदुरबार व नामदेव गिरज्या कलापथक नवापूर यांनी त्यांच्या स्थानिक भाषेत मनोरंजनातून स्वच्छतेविषयक संदेश देऊन सादरीकरण केले. सूत्रसंचालन व आभार जिल्हा पाणी व स्वच्छता कक्षाचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सुनिल पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील सर्व तज्ञ सल्लागार यांनी परिश्रम घेतले.