जिल्ह्यात स्वच्छतेच्या जागृतीसाठी कलापथकांची निवड चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 02:50 PM2020-01-20T14:50:20+5:302020-01-20T14:51:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात शाश्वत स्वच्छतेविषयी जाणीवजागृतीसाठी कलापथकांची मदत घेण्यात येणार आहे. कलापथकांची ...

Selection test for artifacts for cleanliness awareness in the district | जिल्ह्यात स्वच्छतेच्या जागृतीसाठी कलापथकांची निवड चाचणी

जिल्ह्यात स्वच्छतेच्या जागृतीसाठी कलापथकांची निवड चाचणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात शाश्वत स्वच्छतेविषयी जाणीवजागृतीसाठी कलापथकांची मदत घेण्यात येणार आहे. कलापथकांची निवड करण्यासाठी जिल्हा परिषदेत आज सादरीकरण करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्षा अ‍ॅड. सीमा वळवी, उपाध्यक्ष अ‍ॅड.राम रघुवंशी यांच्या हस्ते व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रतन पाडवी, अभिजीत पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भूपेंद्र बेडसे, डॉ. वर्षा फडोळ, शिक्षणाधिकारी एम. व्ही. कदम आदींसह विभाग प्रमुख उपस्थित होते.
सादरीकरणात जिल्ह्यातील एकूण नऊ कलापथकांना निमंत्रित करण्यात आले होते. पैकी सात कलापथक सादरीकरणासाठी उपस्थित होते. सादरीकरणासाठी जिल्ह्यातील प्रेमानंद बहुद्देशीय कलापथक देऊन तालुका शहादा, युवारंग कलापथक नंदुरबार, आपकी जय कलापथक अंमलपाडा तालुका तळोदा, एकलव्य कलापथक धडगाव, जय आदिवासी कलापथक अक्कलकुवा, आदिवासी जनजागृती कलापथक लोय ता. नंदुरबार व नामदेव गिरज्या कलापथक नवापूर यांनी त्यांच्या स्थानिक भाषेत मनोरंजनातून स्वच्छतेविषयक संदेश देऊन सादरीकरण केले. सूत्रसंचालन व आभार जिल्हा पाणी व स्वच्छता कक्षाचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सुनिल पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील सर्व तज्ञ सल्लागार यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Selection test for artifacts for cleanliness awareness in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.