रवींद्र गुरव यांची प्रस्तावित राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:34 IST2021-08-12T04:34:13+5:302021-08-12T04:34:13+5:30
भारत सरकार शिक्षण मंत्रालय यांच्यामार्फत प्रस्तावित राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी जिल्ह्यातील प्रेरणादायी शिक्षक म्हणून रवींद्र गुरव यांची निवड करण्यात आली ...

रवींद्र गुरव यांची प्रस्तावित राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड
भारत सरकार शिक्षण मंत्रालय यांच्यामार्फत प्रस्तावित राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी जिल्ह्यातील प्रेरणादायी शिक्षक म्हणून रवींद्र गुरव यांची निवड करण्यात आली असून त्यांना जि.प. शिक्षण विभाग नंदुरबारतर्फे राज्य व राष्ट्रीय पातळीवर नामनिर्देश करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य पाठपुस्तक निर्मिती पुणे यांच्यामार्फत ई-साहित्य निर्मिती, लोकसहभागातून शाळा उभारणी, विद्यार्थ्यांना प्रेरणादायी व आनंददायी शिक्षण, विविध नवोपक्रम, नावीन्यपूर्ण अध्यापन पद्धती, सामाजिक व सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात गुरव यांनी योगदान दिले. कोरोना काळात शाळा बंद तरीही महाराष्ट्रात हजारो विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवणी व राज्यभरातून साडेतीन हजारापेक्षा जास्त शिक्षकांना ऑनलाइन अध्यापन पद्धती, इ-साहित्य निर्मिती याचे प्रशिक्षण देऊन तंत्रस्नेही बनविले. त्यांच्या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष निखिल तुरखिया, संचालिका सोना तुरखिया, उपाध्यक्ष डी.एम. महाले, सचिव संजय पटेल, समन्वयक हर्षिल तुरखिया, प्राचार्य सुनील परदेशी, मुख्याध्यापिका पुष्पा बागूल, नेम सुशील विद्या मंदिरातील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.