अक्कलकुवा तालुका माध्यमिक शिक्षक संघाच्या कार्यकारिणीची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:32 IST2021-09-27T04:32:36+5:302021-09-27T04:32:36+5:30

अक्कलकुवा तालुका माध्यमिक शिक्षक संघाचा मेळावा सोरापाडा येथील सावित्रीबाई फुले विद्यालयात झाला. अध्यक्षस्थानी संघाचे मावळते अध्यक्ष एल.बी. पाटील होते. ...

Selection of Executive Committee of Akkalkuwa Taluka Secondary Teachers Association | अक्कलकुवा तालुका माध्यमिक शिक्षक संघाच्या कार्यकारिणीची निवड

अक्कलकुवा तालुका माध्यमिक शिक्षक संघाच्या कार्यकारिणीची निवड

अक्कलकुवा तालुका माध्यमिक शिक्षक संघाचा मेळावा सोरापाडा येथील सावित्रीबाई फुले विद्यालयात झाला. अध्यक्षस्थानी संघाचे मावळते अध्यक्ष एल.बी. पाटील होते. मेळाव्याला नंदुरबार जिल्हा माध्यमिक संघाचे अध्यक्ष व निवडणूक निरीक्षक प्रभाकर नांद्रे, जिल्हा लोकशाही आघाडीचे एन.टी. पाटील, सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या प्राचार्या संध्या पटेल, विक्रम खैरनार व संजय पाटील उपस्थित होते.

या मेळाव्यात अक्कलकुवा तालुका माध्यमिक शिक्षक संघाची कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्यात अध्यक्ष संजय जगन्नाथ पाटील, उपाध्यक्ष कैलास सुपडू खोंडे व संजय लोटन खैरनार, सचिव शेषराव विश्वासराव पाटील, सहसचिव विजय धोंडू वंजारी, कोषाध्यक्ष गणेश साहेबराव पवार, महिला आघाडी प्रमुख शीतल यशवंत देसले, तक्रार निवारण समिती जितेंद्र मोहन मगरे, विद्या समिती प्रमुख ईश्वर खंडू सोनवणे, कार्याध्यक्ष महेश हरी पाटील, जिल्हा कार्यकारिणी सदस्य लोटन भावलाल पाटील, चंद्रकांत वसंतराव पवार व विनोद भीमसिंग गिरासे यांची एकमताने निवड करण्यात आली.

Web Title: Selection of Executive Committee of Akkalkuwa Taluka Secondary Teachers Association