सीईओ विनय गौडा यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 12:41 IST2020-02-07T12:40:38+5:302020-02-07T12:41:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शिक्षक बदल्यांसंदर्भात राज्य शासनाने गठीत केलेल्या अभ्यास गटात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ...

सीईओ विनय गौडा यांची निवड
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शिक्षक बदल्यांसंदर्भात राज्य शासनाने गठीत केलेल्या अभ्यास गटात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांचा समावेश करण्यात आला आहे़ राज्यातील इतर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचाही त्यात समावेश आहे़
ग्रामविकास विभागाने राज्यात जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतर व जिल्हांतर्गत बदल्यांसंदर्भात धोरण निश्चित करुन त्यासाठी संगणकीय प्रणाली विकसित करुन बदल्याही केल्या आहेत़ या प्रणालीचा अभ्यास करून त्यामध्ये सुधारणा सुचविणे, बदली धोरण नव्याने निश्चित करणे, यासाठी शासनाने अभ्यासगट गठीत केला असून त्यात विनय गौडांची निवड झाली आहे़