काँग्रेसच्या प्रतोदपदी सीक़े़पाडवी यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 12:11 IST2020-01-11T12:11:43+5:302020-01-11T12:11:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषदेत निवडून आलेल्या काँग्रेस गटाच्या प्रतोदपदी सीक़े़पाडवी यांची निवड करण्यात आली़ काँग्रेसच्या गटाने ...

Seekpadvi elected as Congress candidate | काँग्रेसच्या प्रतोदपदी सीक़े़पाडवी यांची निवड

काँग्रेसच्या प्रतोदपदी सीक़े़पाडवी यांची निवड

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा परिषदेत निवडून आलेल्या काँग्रेस गटाच्या प्रतोदपदी सीक़े़पाडवी यांची निवड करण्यात आली़ काँग्रेसच्या गटाने शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत निवडीची माहिती दिली़
काँग्रेसच्या प्रतोदपदी निवड झालेले सीक़े़पाडवी हे भगदरी ता़ अक्कलकुवा गटातून विजयी झाले होते़ यापूर्वी पाडवी यांनी जिल्हा परिषदेत समाजकल्याण सभापती म्हणून पद भूषवले आहे़
काँग्रेसकडून सीक़े़पाडवी यांची निवड करण्यात आल्यानंतर भाजपकडून हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत़ जिल्हा परिषदेत सत्ता कोणाची येणार याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नसल्याने अध्यक्ष व उपाध्यक्ष पदी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता अधिक ताणली गेली आहे़

Web Title: Seekpadvi elected as Congress candidate