मालकाला पाहून चोरटा गाडी सोडून पळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 14:23 IST2017-10-23T14:23:45+5:302017-10-23T14:23:45+5:30

दुचाकीही चोरीची असल्याचे उघडकीस : वृंदावन कॉलनीतील घटना

Seeing the owner, the sneaky left the car and fled | मालकाला पाहून चोरटा गाडी सोडून पळाला

मालकाला पाहून चोरटा गाडी सोडून पळाला

ठळक मुद्देचोरीबाबत उलटसुलट चर्चा रंगल्या पोलीसांनी चोरटा टाकून पळालेल्या गाडीची तपासणी केली असता वर्धमान नगरातील ज्योती किशोर शिंदे यांची असल्याची माहिती मिळाली आह़े ही गाडी चोरीची असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांनी दिली़ तशी फिर्याद शहर पोलीस ठाण्य

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पहाटेच्या सुमारास चोरी करण्याच्या उद्देशाने दरवाजाचे कुलूप तोडत असताना, अचानक घरमालक बाहेरून घरी आल्याचे पाहिल्यानंतर चोरटय़ाने पळ काढला़ पळ काढणा:या चोरटय़ाने आपले वाहनही जागेवर सोडून देत पळ काढल्याने शहरात चर्चा रंगली आह़े 
नंदुरबार शहरातील वृंदावन सोसायटीतील प्लॉट क्रमांक 52 मध्ये राहणारे विजयकुमार हरकचंद जैन हे कुटूंबियांसह जागरण उत्सवासाठी छत्रपती शिवाजी महाराज नाटय़मंदिरात गेले होत़े रात्रभर कार्यक्रम असल्याने त्यांचा तेथेच मुक्काम होता़ पहाटे पाच वाजता परत आले असता, वॉलकंपाउंडलगत काळ्या रंगाची दुचाकी दिसून आली़ त्यांनी गेटमधून आत पाहिले असता, पिवळ्या रंगाचे टी-शर्ट घातलेला व्यक्ती दाराचे कुलूप टामीने तोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आल़े विजयकुमार जैन यांनी आरडओरड केल्यानंतर चोरटय़ाने घटनास्थळावरून पळ काढला़ पळताना त्याने त्याची दुचाकी तिथेच टाकून दिली़ जैन यांच्यासह परिसरातील नागरिकांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तो मिळून आला नाही़ सकाळी विजयकुमार जैन यांनी एमएच 39 एए 4114 ही दुचाकी उपनगर पोलीस ठाण्यात जमा करून देत अज्ञात चोरटय़ाविरोधात फिर्याद देत गुन्हा दाखल केला आह़े
 

Web Title: Seeing the owner, the sneaky left the car and fled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.