पाहून भवर नदीचा पूर भरुन आला ‘त्यांचा’ ऊर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 12:44 IST2019-06-23T12:44:26+5:302019-06-23T12:44:37+5:30
वसंत मराठे । लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : सातपुडय़ात बरसलेल्या पावसामुळे तालुक्यातून वाहणा:या भवर नदीला शनिवारी दुपारी पुर आला़ ...

पाहून भवर नदीचा पूर भरुन आला ‘त्यांचा’ ऊर
वसंत मराठे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : सातपुडय़ात बरसलेल्या पावसामुळे तालुक्यातून वाहणा:या भवर नदीला शनिवारी दुपारी पुर आला़ दीड वर्षापासून कोरडय़ाठाक पात्रातून वाहणा:या या पाण्याला पाहून नागरिकांचा अक्षरश: ऊर दाटून आला़ तळोद्यातील काही सेवाभावींनी नदीत लोकवर्गणीतून जलसंधारणाचे काम केले होत़े पुरामुळे या कामालाही यश आल़े
तळोदा तालुक्यात यंदा प्रथमच दुष्काळाच्या भीषण झळांनी नागरिक हैराण झाले आहेत़ जून महिना संपण्याच्या मार्गावर असतानाही पावसाने हजेरी लावली नसल्याने शेतक:यांच्या नजरा आकाशाकडे आहेत. पावसाच्या हुलकावणीने नैराश्य पसरले आह़े दरम्यान शनिवारी दुपारी सातपुडय़ाच्या पायथ्याशी रेवानगर, रापापूर, माळखुर्द, कुयरीडाबर, पालबार परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वा:याविना तब्बल एक तास पाऊस बरसला. कुठेही नुकसान न करत बरसलेल्या या पावसामुळे सातपुडय़ातून उगम पावणा:या भवर नदीला पाणी आल़े अवघ्या काहीवेळेत वाहते पाणी खालच्या भागात आल़े या नदीपात्रात छत्रपती शिवाजी महाराज पाणी फाऊंडेशनच्या सहकार्यातून तळोद्यातील नागरिकांचा सहभाग व वर्गणीतून जलसंधारणाची कामे सुरू आहेत. पोकलेन यंत्राद्वारे ठिकठिकाणी खड्डे करण्यात येऊन जलसंधारणाचे काम केले गेले आह़े नदीला आलेल्या पुरामुळे या खड्डय़ांमध्ये मोठय़ा प्रमाणात पाणी साचले होते. हे साचलेले पाणी पाहून फाऊंडेशनचे कार्यकर्ते आनंदित झाल़े सातपुडय़ातून वाहणा:या नाल्यांनाही सायंकाळी पाणी आल्याचे दिसून आले होत़े सपाटीच्या गावांमध्ये मात्र अद्यापही पावसाची प्रतिक्षा आह़े
कापूस लागवड रखडल्याने चिंता तालुक्यातील दुर्गम गावांमध्ये पावसाला सुरुवात झाल्याने शेतक:यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. सपाटीच्या गावांमध्ये पावसाअभावी कापूस लागवड रखडली आहे. तालुक्यातील 60 टक्के शेतक:यांनी अजूनही लागवड केलेली नाही. दुसरीकडे कूपनलिका व विहिरींच्या पाण्याच्या बळावर कापूस लागवड करणा:या शेतक:यांना घटत्या भूजल पातळीचा फटका बसत आह़े भवर नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे पाणीप्रश्न तात्काळ मिटणार नसला तरी जलसिंचनाचा प्रयत्न यश होणार असल्याचे सांगण्यात आले आह़े