ठाणेपाडा रोपवाटीकेत विविध प्रजातीची रोपे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 12:41 IST2020-05-28T12:41:46+5:302020-05-28T12:41:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : तालुक्यातील ठाणेपाडा येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत रोपवाटीकेत विविध प्रजातीची तीन ...

ठाणेपाडा रोपवाटीकेत विविध प्रजातीची रोपे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : तालुक्यातील ठाणेपाडा येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत रोपवाटीकेत विविध प्रजातीची तीन लाख रोपे तयार करण्यात आली आहेत. आमदार शिरीष नाईक यांनी तेथील कामांची पाहणी करून वृक्षारोपण केले.
जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार, सहाय्यक वनसंरक्षक गणेश रणदिवे, नंदुरबारचे वनक्षेत्रपाल मनोज रघुवंशी तसेच ठाणेपाडा येथील वनव्यवस्थापन समितीचे सदस्य व गावकऱ्यांच्या उपस्थितीत आमदार शिरीष नाईक यांनी ठाणेपाडा वनरोपवाटीकेत वृक्षारोपण केले. या ठिकाणी पावसाळ्यात लावण्यासाठी तीन लाख वृक्ष तयार करण्यात आले असून, त्यात आंबा, मुहा, साग, सिताफळ, बोर, खैर, सिसु, भेडा, करंज व जांभूळ आदी रोपांचा समावेश असल्याची माहिती सहाय्यक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी आमदार नाईक यांना दिली. या वेळी आमदार शिरीष नाईक यांनी मराष्टÑ ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत नवापूर तालुक्यात सुरू असलेले लागवड पूर्व कामे, सलग समतलचर कामे, रोपवन कामे, गाळ काढणे आदी कामांचा आढवा घेतला.
वनक्षेत्रात असलेले वन्यजीव बिबट्या, मोर, तरस यांच्यासाठी उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी तयार करण्यात आलेले कृत्रिम पाणवठ्यांबाबत माहिती घेण्यात आली. वनअधिकारी व कर्मचारी यांनी स्थानीक प्रजातीचे रोपे तयार करावेत असे, आमदार नाईक यांनी सूचविले.
वृक्षारोपण काळाजी गरज असून, जास्तीत जास्त वृक्षारोपण करून ते जगवा. नवापूर तालुक्यातील प्रत्येक ग्रामस्थाने आपल्या घरा समोर एक वृक्ष लावलेच पाहीजे यासाठी व्यापक जनजागृतीची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.