श्रीखेड येथे बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:22 IST2021-06-03T04:22:13+5:302021-06-03T04:22:13+5:30

या वेळी उपसरपंच भाऊराव मोते, ग्रामपंचायत सदस्य हरचंद सोनवणे, कृषिमित्र अनिल चव्हाण, युवराज पटले, संदीप पटले, गणेश मोते, संजय ...

Seed processing demonstration at Shrikhed | श्रीखेड येथे बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक

श्रीखेड येथे बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक

या वेळी उपसरपंच भाऊराव मोते, ग्रामपंचायत सदस्य हरचंद सोनवणे, कृषिमित्र अनिल चव्हाण, युवराज पटले, संदीप पटले, गणेश मोते, संजय पटले आदी शेतकरी उपस्थित होते. उपविभागीय कृषी अधिकारी बी.व्ही. जोशी, तालुका कृषी अधिकारी किशोर हडपे, मंडळ कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सहाय्यक सुनील सुळे यांनी स्थानिक बोलीभाषेतच निरोगी पिकासाठी सोयाबीन, तूर, मूग बीज प्रक्रिया व बियाणे उगवण क्षमता तपासणी प्रात्यक्षिक केले.

या वेळी खरीप हंगामातील पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी बीज प्रकिया करूनच पेरणी करणे व बियाणे घरचे असो किंवा विकतचे उगवण क्षमता तपासूनच पेरणी करण्याबाबत जनजागृती करण्यात आली.

खतांचा कार्यक्षम वापर व खत बचतीच्या उपाययोजना निर्देशकानुसारच शेतकऱ्यांनी खत वापरणे, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड योजना, महाडीबीटी पोर्टल योजना, अर्ज एक-योजना अनेक, प्रधानमंत्री ठिंबक सिंचन योजना, कपाशीवरील गुलाबी, शेंदरी बोंडअळी एकात्मिक कीडरोग व्यावस्थापन, व्हर्मी कंपोस्टिंग, नाडेफ कंपोस्टिंग, सेंद्रिय शेती विविध योजनेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

Web Title: Seed processing demonstration at Shrikhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.