अंबापूर येथे कृषी विभागाकडून बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:31 IST2021-05-18T04:31:05+5:302021-05-18T04:31:05+5:30

कृषी पर्यवेक्षक संदीप पाटोळे यांनी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग बाबत शेतकऱ्यांना माहिती दिली तसेच मूलस्थानी जलसंधारण म्हणजेच ...

Seed processing demonstration by Agriculture Department at Ambapur | अंबापूर येथे कृषी विभागाकडून बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक

अंबापूर येथे कृषी विभागाकडून बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक

कृषी पर्यवेक्षक संदीप पाटोळे यांनी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग बाबत शेतकऱ्यांना माहिती दिली तसेच मूलस्थानी जलसंधारण म्हणजेच शेतातील पाणी शेतात या संकल्पनेवर आधारित मृतसरी, उताराला आडवी पेरणी, वाफे पद्धत व सरी-वरंबा पद्धत याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

तसेच कृषी पर्यवेक्षक आर. सी. हिरे यांनी शेतकऱ्यांना डोंगरपट्ट्याला लागून असलेल्या जमिनीत केसाळ अळीचा प्रादुर्भाव होत असल्याने त्यावरील प्रभावी उपाययोजना सांगितली तसेच एकात्मिक कीड व्यवस्थापन महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंअंतर्गत गांडूळ युनिट, नापेड युनिट शेततळे याबाबींची माहिती दिली तसेच ठिबक सिंचन, तुषार सिंचन हरितगृह, शेडनेट गृह या बाबींची ही माहिती देण्यात आली. या कार्यक्रमासाठी ग्रामसेवक हेमंत पाटील, भरत बागुल व परिसरातील शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार संदीप पाटोळे कृषी पर्यवेक्षक यांनी मानले. सामाजिक अंतर ठेवून कृषी विभागाकडून बीजप्रक्रिया प्रात्यक्षिके करण्यात आले.

Web Title: Seed processing demonstration by Agriculture Department at Ambapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.