सलग दुसऱ्या वर्षी पोळा सणावर कोरोनाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:29 IST2021-08-29T04:29:51+5:302021-08-29T04:29:51+5:30
दरवर्षी शेतकरी बांधव आपली जमीन कसण्यासाठी वर्षभर बैलजोडीचा वापर करीत असतात. या जनावरांतप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रात श्रावण अमावास्येला ...

सलग दुसऱ्या वर्षी पोळा सणावर कोरोनाचे सावट
दरवर्षी शेतकरी बांधव आपली जमीन कसण्यासाठी वर्षभर बैलजोडीचा वापर करीत असतात. या जनावरांतप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रात श्रावण अमावास्येला बैल पोळा सण मोठ्या उत्साहात आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा होत असतो. प्रत्येक शेतकऱ्यांकडून सकाळी बैलांची अंघोळ, त्यानंतर त्यांच्या शिंगांना रंगरंगोटी करून त्यांच्या अंगावर झालर तसेच फुगे यांसारख्या विविध वस्तूंनी त्यांना सजविले जाते. नंतर गावागावांत असलेल्या हनुमान मंदिरापर्यंत वाजतगाजत बैलांची मिरवणूक काढली जाते. त्यानंतर संध्याकाळी बैलांची प्रत्येक घरोघरी शेतीउपयोगी साहित्यासोबत विधीवत पूजा केली जाते. नंतर त्यांना पुरणपोळीचे पदार्थ खाऊ घातले जातात. अशा प्रकारे ग्रामीण भागामध्ये बैलपोळा सण साजरा होत असतो. मात्र, इतिहासात मागील वर्षी प्रथमत: बैलपोळा हा सण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना साधेपणाने साजरा करावा लागला होता. या वर्षीही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव पाहता, सलग दुसऱ्या वर्षीही शेतकऱ्यांना बैलपोळा हा सण साधेपणाने साजरा करावा लागणार आहे.