अक्कलकुवा दंगलीतील दुसऱ्या गटातर्फेही फिर्याद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 11:52 IST2019-05-13T11:51:47+5:302019-05-13T11:52:06+5:30
गुन्हा दाखल : याआधी दोन फिर्यादी दाखल

अक्कलकुवा दंगलीतील दुसऱ्या गटातर्फेही फिर्याद
नंदुरबार : अक्कलकुवा दंगलीतील दुसºया गटातर्फेही फिर्याद देण्यात आली असून पाच जणांविरुद्ध दंगलीसह जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्कलकुवा येथे बसमधील जागेच्या वादातून ८ मे रोजी दंगल उसळली होती. याप्रकरणी आधी एका गटाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दुसºया गटाने देखील फिर्याद दिली. त्यानुसार गोलू चंदेल, संदीप मराठे, नरेश भंसाली, मनोज भंसाली, सागर चव्हाण व इतर जमावाने आदील फकीर मोहम्मद मक्राणी (३४) रा.इंदिरानगर यांना लाठ्या, काठ्यांनी व तलवारीने मारहाण करून गाडीचे काच फोडून त्यांच्या खिशातील १५ हजार रुपये रोख जबरीने काढून घेतले.
बाजार चौकात ही घटना घडली. तीन दिवसांनी दिलेल्या फिर्यादीनंतर अक्कलकुवा पोलिसात तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार एम.जे.पवार करीत आहे.