बोगस बियाण्यांची आठवडय़ात दुसरी कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 12:01 IST2019-06-14T12:01:24+5:302019-06-14T12:01:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बंदी असलेले दोन लाख 19 हजार रुपये किंमतीचे बीटी कापूस बियाणे कृषी विभागाने जप्त ...

बोगस बियाण्यांची आठवडय़ात दुसरी कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : बंदी असलेले दोन लाख 19 हजार रुपये किंमतीचे बीटी कापूस बियाणे कृषी विभागाने जप्त केले. आठवडा भरात ही दुसरी कारवाई झाल्याने अवैध व बोगस बियाणे विक्री करणा:यांचे धाबे दणानले आहे.
कृषी विभागाच्या गुणवत्ता व नियंत्रण पथकाने ही कारवाई गुरुवारी दुपारी केली. जिल्हा गुणव नियंत्रक निरिक्षक अरुण तायडे यांना याबाबत माहिती मिळाल्यावर त्यांनी पंच आणि पथकामार्फत नंदुरबार बसस्थानक परिसरात ही कारवाई केली. अॅपेरिक्षाद्वारे बोगस बियाणे नेले जात होते. गेल्या आठवडय़ात देखील कृषी विभागाच्या पथकाने वडाळी व परिसरातील गावांमध्ये धाडी टाकून बोगस बियाणे जप्त केली होती. आता ही दुसरी कारवाई झाली आहे. शेतक:यांना फसविणा:यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
ही कारवाई अरुण तायडे यांच्यासह उपसंचालक एम.एस.रामोळे, तालुका कृषी अधिकारी एन.आर.महाले, कृषी अधिकारी वाय.एस.हिवराळे, श्रीगणेश पाटील, गजानन पाटील यांनी केली. शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.