लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्य शासनाने एसईबीसी हा नवीन संवर्ग निर्माण करत विविध सवलती देणे जाहिर केले आह़े यानुसार महाडीबीटी या पोर्टलवर संवर्गातील विद्याथ्र्याना शिष्यवृत्ती देण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया यंदा सुरु झाली आह़े परंतू ही प्रक्रिया विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी केवळ मनस्ताप ठरत असल्याने हा प्रकार निराधार व निर्थक असल्याचे पालकांकडून बोलले जात आह़े शासनाने काढलेल्या अध्यादेशानुसार यंदा 1 ऑगस्टपासून महाविद्यालयीन शिष्यवृत्त्यांचे अर्ज दाखल करण्यात येत आहेत़ एससी, एसटी, व्हीजेएनटी, एसबीसीसह एसईबीसी संवर्गातील विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करत आहेत़ जिल्ह्यातील विविध भागातून विद्यार्थी अर्ज करण्यासाठी महाऑनलाईन केंद्र किंवा खाजगी सायबर कॅफेवर जाऊन अर्ज भरण्यापूर्वी लॉगीन करत आहेत़ एसईबीसी या संवर्गासाठी शिष्यवृत्ती अर्ज भरणा केल्यानंतर तो स्वीकृतच होत नसल्याने त्यांचा खर्च वाया जात आह़े दोन तास एकाच जागी बसून अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज सबमिट करण्याच्या महाडीबीटी पोर्टलवरील ‘स्टेटस बार’मध्ये एसईबीसी हा संवर्गच येत नसल्याने विद्यार्थी बुचकाळ्यात पडतात़ राज्य शासनाने शिष्यवृत्तीसाठी काढलेल्या अध्यादेशात इतर संवर्गाप्रमाणेच एसईबीसीच्या विद्याथ्र्याना सवलती देण्याचे म्हटले आह़े यामुळे एसईबीसी संवर्गाचे अजर्ही महाडिबीटी या संकेतस्थळावर उपलब्ध झाले आहेत़ परंतू रजिस्ट्रेशन, लॉगिन आणि डॉक्युमेंट स्कॅनिंग केल्यानंतर प्रत्यक्ष अर्ज भरताना दिल्या जाणा:या पर्यायात एसईबीसी हा संवर्गच येत नसल्याने विद्यार्थी गोंधळून जात आहेत़ याबाबत संबधित सायबर चालक किंवा महाईसेवा केंद्रचालक यांनाही माहिती नसल्याने विद्याथ्र्याना प्रक्रिया तेथेच बंद करावी लागत आह़े यामुळे वेळ आणि पैसे वाया जाऊन हाती काही येत नसल्याने मनस्ताप होत आह़े विशेष म्हणजे बरेच पालक हे अर्ज भरण्यासाठी ग्रामीण भागातून पैसे खर्च करुन येत आहेत़ गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या या प्रकारातून सुटका होऊन शिष्यवृत्तीचे अर्ज स्विकृत व्हावे यासाठी विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी सामाजिक न्याय विभागाच्या सहायक समाजकल्याण आयुक्त कार्यालयात पाठपुरावा केला होता़ परंतू शासनाकडून संबधित कार्यालयाला कोणत्याही प्रकारच्या ठोस सूचना केल्या गेलेल्या नसल्याने पालकांचे समाधान झालेले नसल्याचे चित्र आह़े येत्या महिन्यात मुदत संपल्यानंतर अर्जाचे काय, असा प्रश्न पालकांकडून विचारला जात आह़े नंदुरबार जिल्ह्यातील अकरावी बारावीसह पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणा:या मराठा समाजातील विद्यार्थी विद्यार्थिनींचे हे अर्ज शासनाने स्वीकृत करण्यासाठी तातडीने कारवाई करावी अशी मागणी आह़े
महाडीबीटी पोर्टलवरुन भरल्या जाणा:या या ऑनलाईन अर्जासाठी जिल्हास्तरावर संबधित प्रवर्गातील विद्याथ्र्याचा डाटा असलेला टॅब शासनाकडून देण्यात येतो़ इतर संवर्गातील शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणा:यांची माहिती असल्याने त्यांचे अर्ज स्वीकृत होत आहेत़ परंतू एसईबीसी संवर्गाचा डाटा गोळा करणारा टॅब समाजकल्याण विभागाकडे अद्याप नसल्याची माहिती देण्यात आली आह़े नंदुरबार येथील सामाजिक न्याय भवनातील सहायक समाजकल्याण आयुक्त कार्यालयात हा टॅब आलेला नसल्याने कामकाजावर परिणाम होत असल्याचे सांगण्यात आले आह़े हा टॅब कधी येणार याचीही माहिती मिळालेली नाही़ एकीकडे शासनाकडून येणारा टॅब हा विषय प्रलंबित असताना 1 ऑगस्टपासून सुरु झालेल्या शिष्यवृत्तीसाठीच्या अर्जाची मुदत 10 ऑक्टोबर रोजी संपणार असल्याने पालकांसह विद्याथ्र्याच्या चिंता वाढल्या आहेत़ अजर्च भरणा न झालेल्या विद्याथ्र्याना शासन मुदतवाढ देणार का, असा प्रश्न आह़े काही विद्याथ्र्यानी एसईबीसी असे ऑप्शन येत नसल्याने महाडिबीटी पोर्टलवर ‘जनरल’ या कॅटेगिरीत अर्ज भरुन दिला आह़े त्यांना एसईबीसीची सवलत मिळणार का, असाही प्रश्न विचारला जात आह़े पालक आणि विद्याथ्र्याचे समाधान होईल अशी कारवाई होत नसल्याने तीव्र नाराजी आह़े
दरम्यान याबाबत सहायक समाजकल्याण आयुक्त राकेश महाजन यांच्यासोबत संपर्क केला असता, त्यांनी माहिती घेऊन कारवाई करतो असे सांगितल़े संबधित कार्यालयातही याबाबत ठोस अशी माहिती मिळाली नाही़