सातबारा काढण्यासाठी होतेय कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 11:32 IST2019-04-08T11:32:06+5:302019-04-08T11:32:12+5:30
नंदुरबार : शासनाने आॅनलाईन सातबाराची सक्ती केली असली तरी हे सातबारे काढण्यासाठी शेतकऱ्यांसह सर्वांनाच कसरत करावी लागत आहे़ महिन्याभरापासून ...

सातबारा काढण्यासाठी होतेय कसरत
नंदुरबार : शासनाने आॅनलाईन सातबाराची सक्ती केली असली तरी हे सातबारे काढण्यासाठी शेतकऱ्यांसह सर्वांनाच कसरत करावी लागत आहे़ महिन्याभरापासून सुरु असलेल्या या प्रकारामुळे तलाठी कार्यालयांच्या कामकाजावर सर्वाधिक परिणाम झाला असून जिल्ह्यातील ३६ मंडळात सातबारा मिळण्याची गती मंदावली आहे़
जिल्ह्यातील सहा तहसील कार्यालयांमधून सातबारा, नमुना आठ अ, जुने फेरफार आणि जन्म मृत्यूच्या नोंदीचे दाखले आॅनलाईन उपलब्ध करून देण्यात आले आहेत़ महाभूमी या संकेतस्थळावर जिल्ह्याचे २७ लाख ८९ हजार ६०१ दाखले उपलब्ध आहेत़ यात २२ लाख २७ हजार ४१४ सातबारे, १ लाख ६९ हजार ६३८ आठ अ, तीन लाख २० हजार २७९ जुन्यानोंदी आॅनलाईन आहेत़ एवढ्या मोठ्या प्रमाणात दस्तावेज आॅनलाईन झाल्याने कामकाजही वाढले होते़ २०१७ पासून जिल्ह्यात सुरळीतपणे आॅनलाईन दाखल्यांचे वितरण सुरु आहे़ शेतकरी व मालमत्ताधारकांच्या सातबारांचे आॅनलाईन संकलन झाल्याने एका क्लिकवर दाखला उपलब्ध होत होता़ परंतू गत महिन्याभरापासून यात बदल झाला असून सातबारा मिळवण्यासाठी नागरिकांना कसरत करावी लागत आहे़ तलाठींकडून हाताने तयार केलेल्या सातबाराची प्रत मिळणे बंद झाले असल्याने आॅनलाईन सातबारा मिळवण्यासाठी त्या-त्या परिसरातील महा-ई-सेवा केंद्रांमध्ये गर्दी वाढत आहे़
महिनाभर हा प्रकार सुरु राहणार असल्याची माहिती असून जिल्ह्यासह राज्यातील ३५ जिल्ह्यातील सातबारे स्टेट डेटा सेंटरमधून राज्यशासनाने नियुक्त केलेल्या खाजगी कंपनीच्या सर्व्हरवर टाकण्याचे काम सुरु आहे़ गेल्या महिनाभरात केवळ १० जिल्ह्यांचे कामच पूर्ण होऊ शकल्याची माहिती असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये येत्या महिनाभरात डेटा शिफ्टींगचे काम पूर्ण होणार आहे़ भूमिअभिलेख संकेतस्थळावर नंदुरबार तालुक्यातील ६ लाख ७५ हजार ३६६ सातबारे, ३८ हजार ९५२ नमुना अ, १ लाख ७४ जुने फेरफार नोंदी, १५ हजार ९२५ जन्म मृत्यूच्या नोंदी असे एकूण आठ लाख ३० हजार ३१७ दाखले आॅनलाईन स्वरुपात उपलब्ध आहेत़
नवापूर तालुक्यातील तीन लाख ४२ हजार २४१ सातबारे, २४ हजार ६५८ नमुना आठ अ, ३५ हजार ५१६ जुने फेरफार नोंदी, तीन हजार ३०४, जन्म मृत्यू नोंदी असे चार लाख पाच हजार ७१९ दाखले आॅनलाईन झाले आहेत़
शहादा तालुक्यातील सहा लाख ९८ हजार ५७ सातबारे, ५७ हजार ५४३ नमुना आठ अ, जुने फेरफार नोंदी १ लाख १३ हजार ८, जन्म मृत्यूच्या नोंदी ३८ हजार १६० असे एकूण ८ लाख १८ हजार ५६८ दाखले आॅनलाईन आहेत़
धडगाव तालुक्यातील एक लाख ४४ हजार ४६१ सातबारे, १३ हजार २५४ आठ अ, नमुना आठ हजार ७२० जुने फेरफार नोंदी, दोन हजार ३८० जन्म मृत्यूच्या नोंदी, अशा एकूण एक लाख ६८ हजार ८१५ दाखले़
तळोदा तालुक्यात १ लाख ९७ हजार ९६९ सातबारा, ११ हजार ४३४ नमुना आठ अ, ३९ हजार ८१६ जुने फेरफार नोंदी, ६ हजार २६० जन्म-मृत्यू नोंदी असे दोन लाख ५५ हजार ४६९ दाखले़
अक्कलकुवा तालुक्यात २ लाख ५७ हजार ५३० सातबारा, २३ हजार ७९७ नमुना आठ अ, २३ हजार १४५ जुने फेरफार नोंदी, ६ हजार २४१ जन्म मृत्यूच्या नोंदी आॅनलाईन आहेत़ ह्या नोंदी निघत नसल्याने त्या-त्या तालुक्यातील शेतकरी हैैराण झाले आहेत़