डोंगऱ्यादेव विद्यालयात स्काऊट-गाईड शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 13:39 IST2020-02-01T13:39:04+5:302020-02-01T13:39:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील कोकणीपाडा येथील डोंगºयादेव माध्यमिक विद्यालयात दोन दिवसीय निवासी स्काऊट-गाईड शिबिर घेण्यात आले. याप्रसंगी ...

डोंगऱ्यादेव विद्यालयात स्काऊट-गाईड शिबिर
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तालुक्यातील कोकणीपाडा येथील डोंगºयादेव माध्यमिक विद्यालयात दोन दिवसीय निवासी स्काऊट-गाईड शिबिर घेण्यात आले. याप्रसंगी नंदुरबार जिल्हा स्काऊट-गाईडचे सहाय्यक आयुक्त प्राचार्य पुष्पेंद्र रघुवंशी, प्राथमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष सुनील पाटील, सामाजिक कार्यकर्ते नारायण अहिरे, केंद्रप्रमुख एस.एन. पाटील, सरपंच अनिता गांगुर्डे, शाळेचे मुख्याध्यापक कुंदन सोनवणे उपस्थित होते.
शिबिराचे ध्वजारोहण पुष्पेंद्र रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी सांगितले की, स्काऊट व गाईड हा विषय जीवन मूल्य शिकवणारा महत्वाचा विषय असून, त्याचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. केंद्रप्रमुख एस.एन. पाटील यांनीही जीवन कौशल्य, मूल्यशिक्षण आणि स्काऊट-गाईड यांची सांगड घालून मार्गदर्शन केले.
मुख्याध्यापक कुंदन सोनवणे, किर्तीवर्धन तायडे, वसंत वळवी व महेंद्र चौरे यांनी विविध विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच रात्रीच्याप्रसंगी शेकोटी, गाणे, कविता असा कार्यक्रम झाला.
तंबू सजावट, स्वयंपाक, स्लो सायकलिंग, गोणपाटात धावणे, निंबू-चमचा, तीन-पाय शर्यत, फणी गेम अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. दोनदिवसीय निवासी शिबीरात विद्यार्थ्यांच्या मूल्यशिक्षण व जीवनकौशल्यावर आधारित विविध कार्यक्रम घेण्यात आले.
शिबीरासाठी स्काऊट शिक्षक चंद्रमणी बरडे, मुख्याध्यापक कुंदन सोनवणे, पी.एम. साळुंके, राजेश गांगुर्डे, जितेंद्र गिरासे, महेंद्र चौरे, किर्तीवर्धन तायडे, योगेश कोकणी, वसंत वळवी, नरेश कदमबांडे, दशरथ घुगे, राजू वळवी यांनी परिश्रम घेतले.