शहादा महाविद्यालयात ‘विज्ञान दिन’ साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:31 IST2021-03-05T04:31:22+5:302021-03-05T04:31:22+5:30
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. एस. डी. सिंदखेडकर होते. त्यांनी विज्ञानाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व विषद केले. जैवतंत्रज्ञान विभागप्रमुख प्रा. ...

शहादा महाविद्यालयात ‘विज्ञान दिन’ साजरा
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. एस. डी. सिंदखेडकर होते. त्यांनी विज्ञानाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व विषद केले. जैवतंत्रज्ञान विभागप्रमुख प्रा. डॉ. मृणाल जोगी यांनी प्रास्ताविकात या उपक्रमाचे उद्दिष्ट स्पष्ट करीत शास्त्रज्ञ सर सी. व्ही. रामन यांच्याविषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांनी उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेत विज्ञानातील विविध विषयांवर मनोगत व्यक्त केले. उपप्राचार्य डॉ. एम.के. पटेल यांनी ऑनलाईन सहभागी होत विविध उपक्रमांची माहिती दिली. प्राचार्य डॉ. आर. एस. पाटील यांनीही ऑनलाईन सहभाग घेत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. सूत्रसंचालन प्रा. हितेंद्र जाधव यांनी, तर आभार प्रा. रमाकांत माळी यांनी मानले. उपक्रमाची तांत्रिक बाजू प्रा. डॉ. मिलिंद पाटील यांनी सांभाळली. कार्यक्रमासाठी प्रयोगशाळा सहायक दिनेश बागले, अनिल पाटील, संजय शिंदे आदींनी सहकार्य केले. या उपक्रमासाठी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव कमलताई पाटील, समन्वयक प्रा. मकरंद पाटील, पी. आर. पाटील, प्राचार्य डॉ. आर. एस. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.