भागापूरला ‘भिंतीवरची शाळा’ उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 13:09 IST2020-08-31T13:08:34+5:302020-08-31T13:09:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : कोरोनामुळे मार्च महिन्यापासून सर्वच शाळा बंद आहेत. परंतु शहादा तालुक्यातील भागापूर येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात ...

भागापूरला ‘भिंतीवरची शाळा’ उपक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राह्मणपुरी : कोरोनामुळे मार्च महिन्यापासून सर्वच शाळा बंद आहेत. परंतु शहादा तालुक्यातील भागापूर येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून येथील जि.प. शाळेच्या शिक्षकांनी कंबर कसली. आॅनलाईन शिक्षण सुरू झाले असले तरी येथील पालक हे अंत्यत गरीब व अज्ञानी आहेत. यावर मार्ग काढण्यासाठी येथील शिक्षकांनी ‘भिंतीवरची शाळा’ उपक्रम सुरू करून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देण्यात येत आहेत.
भागापूर गावात घरकुलांची संख्या मोठी आहे. या घरकुलांच्या भिंतींचा उपयोग येथील शिक्षकांनी ‘भिंतीवरची शाळा’ उपक्रमासाठी केला. या भिंतींवर शिक्षकांनी बाराखडी, अंकगणित, इंग्रजी एबीसीडी रेखाटले आहेत. गावातील प्रत्येक गल्लीतील घरकुलांच्या भिंतीवर हा अभ्यास रेखाटला आहे. फावल्या वेळेत विद्यार्थी या भिंतीजवळ उभे राहून अभ्यास करतात. वाचन, लेखन करतात. त्यामुळे येथील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहतात. रेखांकन आॅईल पेंटमध्ये असल्याने पाऊस, उन्हाचा काही त्रास होत नाही. कोरोनामुळे मुले गल्लीतच राहतात व भिंतीवरचा अभ्यास करतात. गावात अनेक ठिकाणी रेखाटन असल्याने याचा फायदा विद्यार्थ्यांना होत आहे. हा उपक्रम राबविण्यात ग्रामस्थांचाही सहभाग मिळत आहे. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्रावण कोळी, नवलसिंग राजपूत, अभय नरवाडे विशेष प्रयत्न करीत आहेत.