माहिती भरण्यासाठी शाळा उदासिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 20:19 IST2019-04-14T20:19:15+5:302019-04-14T20:19:35+5:30

शालेय पोषण आहार : अर्धा एप्रिल उलटल्यावरही बऱ्याच शाळांची माहिती नाही

The school is filled with dullness to fill the information | माहिती भरण्यासाठी शाळा उदासिन

माहिती भरण्यासाठी शाळा उदासिन

नंदुरबार : शालेय पोषण आहाराचे अनुदान एप्रिल महिन्यापासून ‘पीएफएमसी’ प्रणालीव्दारे संबंधित शाळांच्या थेट खात्यावर जमा होणार आहे़ परंतु बहुतेक शाळांनी आपली माहिती दिलेल्या संकेतस्थळावर भरली नसल्याचे माहिती सूत्रांनी दिली़ त्यामुळे शालेय पोषण आहाराचा लाभ विद्यार्थ्यांना मिळणार कसा? असा प्रश्न निर्माण होत आहे़
एप्रिल महिन्यापासून शालेय पोषण आहाराच्या अनुदानाची रक्कम पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजेच ‘पीएफएमसी’ प्रणालीव्दारे संबंधित शाळांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे़ त्यासाठी संबंधित सर्व शाळांना आपआपल्या शाळेची माहिती शासनाच्या संकेतस्थळावर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत भरणे बंधनकारक होते़ परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अद्यापही बºयाच शाळांनी संबंधित माहिती संकेतस्थळावर भरलेली नाही़
शाळेच्या खात्यावर शालेय पोषण आहाराचे अनुदान मिळण्यासाठी संबंधित शाळांनी आपआपल्या शाळांची माहिती शासनाकडून देण्यात आलेल्या संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन करुन भरणे महत्वाचे आहे़ त्यासाठी संबंधित प्रत्येक शाळेला स्वतंत्रपणे आयडी व कोड देण्यात आलेला आहे़ परंतु सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनेक वेळा या संकेतस्थळावर शाळांची माहिती अपलोड होत नसल्याने वारंवार शाळेची माहिती भरावी लागत आहे़ त्यामुळे अनेक शाळांना अद्याप माहिती भरता आलेली नाही़
१ एप्रिलपासून शासनाने शालेय पोषण आहाराबाबत नवीन धोरण अंमलात आणण्याचे ठरवले आहे़ त्यानूसार पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजेच पीएफएमसी प्रणालीव्दारे संबंधित शाळांच्या खात्यावर शालेय पोषण आहाराचे अनुदान जमा करण्यात येणार आहे़
यासाठी जिल्ह्यातील संबंधित शाळांनी आपआपल्या शाळेची माहिती, विद्यार्थी संख्या, बँक खातेक्रमांक आदींची माहिती शालेय शिक्षण क्रीडा विभागाच्या एज्युकेशन महाराष्ट्र या संकेतस्थळावर भरावयाची आहे़ या नवीन प्रणालीची सुुरुवात होणार असल्याने जिल्ह्यातील शाळा प्रशासनांकडून आपआपली माहिती भरणे आवश्यक होते़ जिल्ह्यातील १ हजार ७३१ शाळांकडून ही माहिती भरण्याची काम करण्यात येत होते़ परंतु अद्यापही बºयाच शाळांना आपली माहिती संबंधित संकेतस्थळावर भरता आलेली नाही़ संबंधित शाळांच्या शाळांच्या मुख्याध्यापकांना आपल्या शाळेची माहिती संकेतस्थळावर भरण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे़ जिल्ह्यातील खाजगी, अनुदानीत प्राथमिक तसेच माध्यमिक विभागाच्या जळपास १ हजार ७३१ शाळांकडून विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचे वाटप करण्यात येत असते़
ग्रामीण व शहरी असे दोन विभाग पाडून शालेय पोषण आहाराच्या अनुदानाचे वाटप करण्यात येत असते़ यात, ग्रामीण भागातील पहिली ते पाचवीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला १ रुपया ५१ पैसे तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्याला २ रुपये १७ पैसे देण्यात येत असतात़ तर शहरी भागातील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना ४ रुपये १२ पैसे तर सहावी ते आठवीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला ६ रुपये १८ पैसे अनुदानाचे वाटप करण्यात येत असते़

Web Title: The school is filled with dullness to fill the information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.