अॅडमिशनच्या बहाण्याने विद्याथ्र्याची फसवणूक
By Admin | Updated: June 29, 2017 16:19 IST2017-06-29T16:19:16+5:302017-06-29T16:19:16+5:30
बंगलोर येथील महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो असे सांगून विद्याथ्र्याची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे.

अॅडमिशनच्या बहाण्याने विद्याथ्र्याची फसवणूक
ऑनलाईन लोकमत
नंदुरबार,दि.29 : बंगलोर येथील महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो असे सांगून चार वर्षापूर्वी विद्याथ्र्याकडून दहा हजार रुपये रोख आणि दहावी व बारावीचे कागदपत्रे घेवून फसवणूक केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळोदा येथील नारायण पार्कमध्ये राहणारे प्रफुल्ल अश्विन वाघ या विद्याथ्र्याला बीबीए कॉलेज बंगलोर येथे प्रवेश मिळवून देतो म्हणून नाला वडफळी, ता.अक्कलकुवा येथील प्रविण विक्रम पाडवी याने सांगितले होते. त्यासाठी त्याने दहा हजार रुपये रोख घेतले. शिवाय दहावी व बारावीचे गुणपत्रक आणि इतर कागदपत्रे देखील घेतली होती. परंतु चार वर्षात कॉलेजला नंबरही लावून दिला नाही आणि कागदपत्रेही परत दिले नाहीत. शिवाय दहा हजारात फसवणूक देखील केली. याप्रकरणी प्रफुल्ल वाघ यांनी फिर्याद दिल्याने प्रवीण विक्रम पाडवी याच्याविरुद्ध तळोदा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.