सातपुडय़ाच्या गाव-पाडय़ात आजही पारंपरिक वाद्यांची क्रेझ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 13:12 IST2019-06-10T13:12:44+5:302019-06-10T13:12:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क रांझणी : डीजे व अत्याधुनिक बॅण्डची क्रेझ असली तरी सातपुडय़ाच्या आदिवासी भागात पारंपरिक वाद्यांचे आकर्षण आजही ...

Satpurudi's village-padaya still retains the traditional scriptures | सातपुडय़ाच्या गाव-पाडय़ात आजही पारंपरिक वाद्यांची क्रेझ कायम

सातपुडय़ाच्या गाव-पाडय़ात आजही पारंपरिक वाद्यांची क्रेझ कायम

लोकमत न्यूज नेटवर्क
रांझणी : डीजे व अत्याधुनिक बॅण्डची क्रेझ असली तरी सातपुडय़ाच्या आदिवासी भागात पारंपरिक वाद्यांचे आकर्षण आजही कायम आहे. पारंपरिक वाद्याशिवाय लगA समारंभ  व इतर कार्यक्रमांची रंगत वाढत   नाही.
तळोदा तालुक्यातील सातपुडा पायथ्यालगतच्या रोझवा पुनर्वसन, रेवानगर पुनर्वसन, जीवननगर पुनर्वसनसह परिसरात सध्या लग्नसरईची धूम सुरू असून, सर्वत्र बॅण्ड व डीजेचा आवाज घुमट असल्याचे चित्र दिसून येत आहे.  मात्र पारंपरिक   संगीत वाद्यांनी आपले स्थान अद्यापही टिकून ठेवले असून, ज्येष्ठांकडून ते वाजवण्यास प्रारंभ झाल्यानंतर लागलीच तरूणाई त्यावर ठेकेधरत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, लग्नसमारंभामध्ये  रनथा, पावली वाजवण्यास येत  असून, त्याचे सुमधूर संगीत ऐकण्यास आबालवृद्ध लागलीच गोळा होत असल्याचे दिसून येत आहे. पारंपरिक रनथा हे वाद्य बांबू, नारळाची  कवटी, रबर यापासून घरगुती बनवण्यात येत असले तरी त्यांची वैशिष्टय़पूर्ण रचनाही आकर्षण ठरत आहे. परिसरातून हे वाद्य वाजवणा:या कलाकारांना निमंत्रितही करण्यात  येत आहे. त्यामुळे आजच्या घडीलाही जुन्या वाद्यांनी आपले स्थान टिकवून ठेवल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Satpurudi's village-padaya still retains the traditional scriptures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.