सातबारा संगणकीकरण डिसेंबरअखेर पुर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 12:48 IST2019-11-28T12:48:01+5:302019-11-28T12:48:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात सातबारा संगणकीकरणाचे कामकाज वेगाने सुरू असून या मोहिमेच्या अंतिम टप्प्यातील कामाचा आढावा उपजिल्हाधिकारी ...

Satbara computerization completed by end of December | सातबारा संगणकीकरण डिसेंबरअखेर पुर्ण

सातबारा संगणकीकरण डिसेंबरअखेर पुर्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात सातबारा संगणकीकरणाचे कामकाज वेगाने सुरू असून या मोहिमेच्या अंतिम टप्प्यातील कामाचा आढावा उपजिल्हाधिकारी धनंजय निकम यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीस नायब तहसिलदार प्रविण बागुल, जिल्ह्यातील महसूल नायब तहसिलदार, प्रत्येक तालुक्यातील चार तलाठी, दोन मंडळ अधिकारी आदी अधिकारी उपस्थित होते. यावेळी  निकम म्हणाले, हस्तलिखित सातबारा आता बंद झाला असून सातबारा संगणकीकरणामुळे आता तलाठी कार्यालया ऐवजी शासनाच्या संकेतस्थळावर 15 रुपये शुल्क भरुन डिजीटल सहीचा सातबारा उपलब्ध होईल. यासाठी आवश्यक कार्यवाही संबंधित कर्मचारी आणि अधिका:यांनी कालमर्यादेत पुर्ण करावी. त्याबाबत अडचणी आल्यास वरिष्ठ अधिका:यांचे मार्गदर्शन घेण्यात यावे. येत्या आठ ते दहा दिवसात सर्व नोंदी अद्ययावत करून सातबारा संगणीकरणाचे काम पुर्ण करावे, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात एकूण तीन लाख 90 हजार 540 सातबारा संख्या असून आतापयर्ंत तीन लाख 59 हजार 141 सातबा:यांचे संगणकीकरण करण्यात आले आहे. उर्वरित सातबारा संगणकीकरणाचे 31 डिसेंबर पूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे. आज अखेर 91.96 टक्के संगणकीकरणाचे काम झाले असून 31 डिसेंबर पयर्ंत जिल्ह्यातील शंभर टक्के संगणीकरणाचे काम होईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
सातबारा संगणीकरणामुळे खातेदाराला घरबसल्या सातबारा उपलब्ध होणार आहे. नागरिकांना या कामासाठी तलाठी कार्यालयात जावे लागणार नसल्याने त्यांचा वेळ व खर्च वाचणार असून महसूल कर्मचा:यांनादेखील इतर    कार्यालयीन कामांसाठी अधिकचा वेळ मिळणार आहे. तलाठी कार्यालयासोबतच मंडळ अधिकारी स्तरावर ‘फिफो’ ही प्रणाली सुरु करण्यात आली असून त्यामुळे सातबारा व फेरफार नोंदी घेण्याच्या कामात गती येणार आहे.
 

Web Title: Satbara computerization completed by end of December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.