सरपंचपदाचा ४२ लाखात लिलाव होणारी खोंडामळीची निवडणूक अखेर रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:26 IST2021-01-14T04:26:33+5:302021-01-14T04:26:33+5:30
नंदुरबार : ४२ लाखात ग्रामपंचायत सत्ता व सरपंच पदाचा लिलाव करणाऱ्या खोंडामळी, ता.नंदुरबार ग्रामपंचायतीची निवडणूक रद्द करण्याचा निर्णय राज्य ...

सरपंचपदाचा ४२ लाखात लिलाव होणारी खोंडामळीची निवडणूक अखेर रद्द
नंदुरबार : ४२ लाखात ग्रामपंचायत सत्ता व सरपंच पदाचा लिलाव करणाऱ्या खोंडामळी, ता.नंदुरबार ग्रामपंचायतीची निवडणूक रद्द करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. येथे माघारीअंती एकुण ११ जागासांठी ११ अर्ज शिल्लक राहिल्याने निवडणूक बिनविरोध झाली होती.
खोंडामळी गावातील वाघेश्वरी मातेच्या मंदीराच्या उभारणीसाठी जो जास्त देणगी देईल त्याच्या पॅनेलला सरपंचपद व ग्रामपंचायत सोपविण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार प्रदीप वना पाटील यांनी सर्वाधिक ४२ हजारांची बोली लावली होती. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रारी झाल्या होत्या. त्यानुसार चौकशी अहवाल अंती या गावाची निवडणूक रद्द करण्यात आली आहे.
येथे ११ जागांसाठी माघारीअंती ११उमेदवार शिल्लक होते. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली होती. सरपंचदी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे तालुका अध्यक्ष प्रदीप वना पाटील यांची कन्या सरपंचपदी कु. रोहीणी प्रदीप पाटील यांचे नाव निश्चित होते तर सदस्य म्हणुन योगिता प्रदीप पाटील, लता गूलाब पाटील, बबनबाई कौतिक पाटील, पुनम संदीप पाटील, अश्विनी सदाशिव पाटील, अरुणा जगदीश भील, राकेश भिलाजी पाटील, दिनेश शामराव सोनवणे, छोटू फत्तु भील, रविंद्र महेंद्र जावरे यांचा समावेश होता.