सरदार सरोवर पुर्ण भरले, पण महाराष्टÑाला मिळाले काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 13:00 IST2020-09-18T13:00:07+5:302020-09-18T13:00:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सरदार सरोवर प्रकल्प पुर्ण करून गुजरात सरकारने तो पुर्ण जलस्तरपर्यंत भरला. पण महाराष्टÑातील विस्थापीतांचे ...

सरदार सरोवर पुर्ण भरले, पण महाराष्टÑाला मिळाले काय?
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सरदार सरोवर प्रकल्प पुर्ण करून गुजरात सरकारने तो पुर्ण जलस्तरपर्यंत भरला. पण महाराष्टÑातील विस्थापीतांचे अद्यापही ना पुर्ण पुनर्वसन झाले, ना महाराष्टÑाला त्याचा काही लाभ मिळाला. या संदर्भात महाराष्टÑ शासन काही विचार करणार आहे का? असा सवाल नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी केला आहे.
सरदार सरोवर प्रकल्पाचे पुर्व नियोजनाप्रमाणे पुर्ण बांधकाम झाले असून गेल्या वर्षी हा प्रकल्प १७ सप्टेबरला पुर्ण भरला होता. यंदाही १७ सप्टेबरचे औचित्य साधून तो भरला आहे. या पार्श्वभुमीवर आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर व आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून याबाबतचे विविध प्रश्न उपस्थित केले आहे.
या प्रकल्पामुळे अद्यापही महाराष्टÑातील पुर्ण पुनर्वसन झालेले नाही असा आरोप करीत मध्यप्रदेशात ज्या पद्धतीने जलसत्याग्रह सुरू आहे तसे आंदोलन महाराष्टÑातही करण्याचा इशारा त्यांनी या पत्रात दिला आहे.