सरदार बनला रोझवा पुनर्वसनचा ‘सरदार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:29 IST2021-02-14T04:29:26+5:302021-02-14T04:29:26+5:30

रोझवा पुनर्वसन ग्रा.पं.च्या निवडणुकीसात सरदार पाडक्या पाडवी, वंतीबाई उदेसिंग तडवी, वर्षा दिनेश पावरा, भारतसिंग दादला पावरा, विजय जोरदार पावरा, ...

Sardar becomes Rozwa Rehabilitation 'Sardar' | सरदार बनला रोझवा पुनर्वसनचा ‘सरदार’

सरदार बनला रोझवा पुनर्वसनचा ‘सरदार’

रोझवा पुनर्वसन ग्रा.पं.च्या निवडणुकीसात सरदार पाडक्या पाडवी, वंतीबाई उदेसिंग तडवी, वर्षा दिनेश पावरा, भारतसिंग दादला पावरा, विजय जोरदार पावरा, बालगीर पुन्या वसावे, भारती मोज्या पावरा, दिलमा वजऱ्या वसावे, एमना हारसिंग पावरा हे विजयी झाले होते. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीतही माजी सभापती स्व.जहांगीर पावरा यांच्या पॅनलची सत्ता होती. या वेळीही डॉ.रिमान पावरा व दिनेश पावरा यांनी पॅनलची धुरा सांभाळत ग्रामपंचायत आपल्याकडे राखण्यात यश मिळवले असून सरदार पाडक्या पाडवी या युवकाला गाव विकासासाठी संधी देण्यात आल्याने समाधान व्यक्त होत आहे. सरदार पाडवी हे गेल्या पंचवार्षिकमध्येही सदस्य होते. त्यामुळे त्यांना अनुभव असल्याने गावात विकास कामे करण्यास मदत होणार आहे. रोझवा पुनर्वसन ग्रामंचायत निवडणुकीत निवडून आलेले सर्वच सदस्य युवा आहेत. येत्या काळात ही नवी टीम आपल्या गावासाठी किती निधी, किती विकास कामे खेचून आणते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: Sardar becomes Rozwa Rehabilitation 'Sardar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.