सारंगखेड्याचे दाम्पत्य इंदूरला पॉझिटिव्ह ३२ जणांचे घेतले स्वॅब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 12:43 IST2020-08-01T12:43:21+5:302020-08-01T12:43:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील खाजगी डॉक्टर व त्यांच्या पत्नीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सारंगखेडा गाव ...

Sarangkheda couple took 32 positive swabs to Indore | सारंगखेड्याचे दाम्पत्य इंदूरला पॉझिटिव्ह ३२ जणांचे घेतले स्वॅब

सारंगखेड्याचे दाम्पत्य इंदूरला पॉझिटिव्ह ३२ जणांचे घेतले स्वॅब


लोकमत न्यूज नेटवर्क
सारंगखेडा : शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील खाजगी डॉक्टर व त्यांच्या पत्नीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सारंगखेडा गाव पूर्णपणे सोमवार पर्यंत बंद करण्यात आले आहे़ यादरम्यान बाहेर गावाहून येणाऱ्यांना मज्जाव करण्यात आला असून बाधित रुग्णाच्या घराच्या परिसराला कंटेन्मेंट झोन करण्यात आला आहे़
दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या कुटूंबातील तीन सदस्य आणि संपर्कात आलेल्या २९ जणाचे स्बॅब घेण्यात येऊन त्यांना होमक्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ़ राजेंद्र पेंढारकर यांनी दिली आहे़ बाधित झालेले डॉक्टर पत्नीसह २९ जुलै रोजी इंदूर येथे गेले होते़ त्यांना त्याचठिकाणी लक्षणे जाणवू लागल्याने त्यांनी तेथे स्वॅब देऊन तपासणी केली होती़ दरम्यान या स्वॅबचा अहवाल ३० रोजी समोर आला होता़ यात दोघेही पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले होते़ त्यांनी ही माहिती सारंगखेडा प्राथकि आरोग्य केंद्राला दिल्यानंतर आरोग्य, पोलीस आणि महसूल प्रशासनाने तातडीने उपाययोजनांना सुरूवात केली़ यांतर्गत ग्रामपंपचायतीने गावात उपाययोजनांना वेग दिला आहे़
दरम्यान शुक्रवारी सकाळी ९ वाजेपासून प्रांताधिकारी डॉ़ चेतन गिरासे, तहसीलदार मिलींद कुलकर्णी, गटविकास विकास अधिकारी सी़टीग़ोसावी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ़ राजेंद्र पेंढारकर, पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे, ग्रामविकास अधिकारी संजय मंडळे, सी़एम़पाटील, वैद्यकीय अधिकरी डॉ़ किशोर पाटील, तलाठी संजय मालपुरे यांनी ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेत बाधितांच्या संपर्कात आलेल्यांची यादी तयार करुन घेत त्यांना क्वारंटाईन करण्याची कारवाई सुरू केली़ दरम्यान आरोग्य विभागाच्या पथकाने १५ पथके तयार करुन घरोघरी सर्वेक्षण केले आहे़ बाधित डॉक्टर हे पत्नीसह इंदूर येथे उपचार घेत असल्याची माहिती देण्यात आली आहे़
शुक्रवारी सकाळपासून गावात आरोग्य विभागाच्या पथकांनी घरोघरी भेटी देत सर्वेक्षण केले होते़ या पथकांना सारंगखेडा ग्रामपंचायतीतर्फे सॅनेटायझर बॉटल वाटप करण्यात आल्या़
बाधितांच्या संपर्कात आलेल्यांनी घाबरुन न जाता पुढे येण्याचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल यांनी कळवले आहे़ तीन दिवस सारंगखेडा गाव बंद ठेवण्यात येणार असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाकडून गावात शुक्रवारी दिवसभर तशा प्रकारच्या सूचना करण्यात येत होत्या़ 

Web Title: Sarangkheda couple took 32 positive swabs to Indore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.