सारंगखेड्यात दिव्यांग बंधूंच्या गायनातून कोरोनाची भिती झाली दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 12:34 IST2020-03-19T12:34:39+5:302020-03-19T12:34:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे दृष्टीहीन असलेल्या दिव्यांग बांधवांनी गीतांद्वारे कोरोनाची भिती दूर करत नागरिकांना ...

In the Sarangkheda, the coroner's horror faded away from the singing of Divyang brothers | सारंगखेड्यात दिव्यांग बंधूंच्या गायनातून कोरोनाची भिती झाली दूर

सारंगखेड्यात दिव्यांग बंधूंच्या गायनातून कोरोनाची भिती झाली दूर

लोकमत न्यूज नेटवर्क
सारंगखेडा : शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे दृष्टीहीन असलेल्या दिव्यांग बांधवांनी गीतांद्वारे कोरोनाची भिती दूर करत नागरिकांना जनजागृतीचा प्रकाश देण्याचा अनोखा प्रयत्न केला़ मंगळवारी रात्री आठ वाजता सारंगखेडा गावाती मुख्य चौकात ही जनजागृती मैफल रंगली होती़
धुळे येथील नेत्रहीन बहुउद्देशीय संघटनेच्या माध्यमातून एकत्र आलेले जयंत चव्हाण, अविनाश बागुल, बापू मराठे, विश्वनाथ सुतार, संजय बागुल हे एकत्र आले होते़ गायन, वादनाचा छंद असलेल्या या पाच जणांनी एकत्र येऊन सूर सितारा टीमची स्थापना केली आहे़ अंध असल्याने एकमेकांचा आधार घेत गावोगावी ते भटकंती करतात़ यात विशेष म्हणजे शासनाचे कोणतेही सहाय्य न घेत केवळ जनजागृतीचा वसा घेत हे पाचही जण फिरत आहे़ सध्या कोरोनाची दहशत वाढत असल्याने पाचही जणांनी धुळे व नंदुरबार जिल्हा पिंजून काढणे सुरु केले आहे़ यात मंगळवारी हे पथक सारंगखेड्यात दाखल झाले होते़ याठिकाणी गायक अविनाश बागुल व जयंत चव्हाण या दोघांनी विविध गीतांचे सादरीकरण उपस्थितांची मने जिंकून घेतली़ त्यांना ढोलकीवादक विश्वनाथ सुतार व संजय बागुल व आॅॅरगनवर बापू मराठे यांनी साथसंगत केली़ भारुडाच्या माध्यमातून कोरोनाची दहशत कमी करुन उपाययोजना काय असाव्यात याचा दंडक त्यांनी उपस्थितांना घालून दिला़ सुमुधूर अशा या जनजागृतीला नागरिकांनीही दाद या कलावंतांचे कौतूक केले़ माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयपालसिंह रावल व नागरिकांनी त्यांचे कौतूक करत कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी सज्ज असल्याची ग्वाही दिली़
या पथकाने आजवर तंटामुक्ती, दारुबंदी, स्वच्छ भारत अभियानासाठी स्वेच्छेने कार्य केले आहे़

Web Title: In the Sarangkheda, the coroner's horror faded away from the singing of Divyang brothers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.