सारंगखेडा बॅरेज दरवाज्यांना गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 13:16 IST2018-04-12T13:16:36+5:302018-04-12T13:16:36+5:30

लाखो लिटर पाणी वाया : अनेक पाणीपुरवठा योजनांना येत्या काळात झळ बसणार

Sarangkheda Barrage Doors Destroy | सारंगखेडा बॅरेज दरवाज्यांना गळती

सारंगखेडा बॅरेज दरवाज्यांना गळती

लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 12 : शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील बॅरेजच्या  दरवाज्यांना गळती लागल्याने लाखो लीटर पाणी वाया जात असल्याचे दिसून येत आहे. या बॅरेजमधून पाणीपुरवठा होत असलेल्या गावांना येत्या महिन्यात पाणीपुरवठय़ाची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे संबंधित वरिष्ठ अधिका:यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देवून त्वरित उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
येथील बॅरेजच्या अनेक गेटला गळती लागली असून, याकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या बॅरेजमधून सारंगखेडा, कळंबू, टेंभा व शहादा शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र या बॅरेजला लागलेल्या गळतीमुळे दिवसेंदिवस पाणी पातळी कमी होत असल्याचे दिसून येत आहे. ऐन उन्हाळ्यात या गावांना पाण्याच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागणार असल्याची शक्यता आहे. या बॅरेजमध्ये सध्या 30 ते 35 टक्केच पाणी साठा आहे. मात्र तोही येथील गेटला लागलेल्या गळतीमुळे दिवसेंदिवस कमी होत आहे. तसेच या बॅरेजमधून परिसरातील अनेक शेतक:यांनी परवानी घेवून लाखो रुपये खचरून पाईपलाईनद्वारे शेतार्पयत पाणी नेले आहे. ऐन उन्हाळ्यात पपई व कापूस लागवडीसह उभ्या असलेल्या ऊस पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  आधीच या बॅरेजचे पाणी शोभेची वस्तू म्हणून चर्चीले जात असतांना संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे शेतकरी व ग्रामस्थांना पाण्याच्या समस्येला सोमोरे जावे लागणार असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
सारंगखेडा बॅरेज पूर्णत्वास आल्यानंतर परिसरातील शेतक:यांनी आनंद व्यक्त केला होता. या वेळी बॅरेजमधील पाणी उपसा सिंचनाद्वारे शेतार्पयत जाणार अशी अपेक्षा शेतक:यांना होती. मात्र ती अपेक्षाच राहील. येथील पाणी मोजक्याच शेतक:यांनी खाजगी उपसा सिंचनाद्वारे लाखो रुपये खचरून शेतार्पयत नेले आहे. या बॅरेजला लागलेल्या लिकेजमुळे दिवसेंदिवसे पाणीसाठा कमी होत असल्याने शेतक:यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
 

Web Title: Sarangkheda Barrage Doors Destroy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.