कलम 411 च्या अतिरेकामुळे सराफ हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 12:13 IST2019-09-20T12:12:58+5:302019-09-20T12:13:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : भादंवि कलम 411 ला सराफा व्यावसायिकांचा विरोध नाही. परंतु त्या कलमाखाली सराफा व्यावसायिकांना होणारा ...

Saraf is offended by the excesses of section 411 | कलम 411 च्या अतिरेकामुळे सराफ हैराण

कलम 411 च्या अतिरेकामुळे सराफ हैराण

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : भादंवि कलम 411 ला सराफा व्यावसायिकांचा विरोध नाही. परंतु त्या कलमाखाली सराफा व्यावसायिकांना होणारा त्रास देण्याच्या प्रकाराला विरोध असल्याचे प्रतिपादन राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनचे उपाध्यक्ष संतोष वर्मा यांनी केले. 
नंदुरबार शहर सराफ असोशिएशनतर्फे गुरुवारी एक दिवशीय  जिल्हास्तरीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनचे उपाध्यक्ष संतोष वर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी कर सल्लागार संतोष नानकांनी, सहसचिव मुकुंद विसपुते, अजय नाशिककर, विजयकुमार डहाळे, जिल्हाध्यक्ष मनोज श्रॉफ, प्रशांत विसपुते, शहराध्यक्ष सुनील सोनार उपस्थित होते. वर्मा म्हणाले, कलम 411 चा त्रास मोठय़ा प्रमाणात सोनार समाजातील व्यापा:यांना होत आहे. आम्ही कधीही विरोध केला नाही. तो आपल्या संरक्षणासाठी तयार झालेला कायदा आहे. त्यात जामीन होतो त्याला कधीही विरोध करू नका, तुम्ही वाईट वागू नका. सुवर्णकार समाज इमानदारीने व्यवसाय करणारा आहे. कायद्याचे अज्ञान काढून टाका हिमतीने त्याचा सामना करा. कायद्याचा आधार घेऊन तुम्ही काम करा. आज पोलिसांपासून संरक्षण द्या अशी मागणी करण्याची वेळ आली आहे. सोनाराला चोर व पोलिस दोघांचाही त्रास होतो आहे. सराफा व्यावसायिक सर्वात जास्त 34 विविध प्रकाराने टॅक्स देत असतो. तेव्हा त्याला कोणते संरक्षण दिले जाते हेही बघितले गेले पाहिजे. 
सुनील सोनार यांनी सांगितले, आदिवासी जिल्ह्यात वावरताना आपल्याला मोठय़ा शहरापेक्षा वेगळ्या अडचणी निर्माण होतात. स्थानिक अडचणी पण माहिती करून देणे आवश्यक असल्याचे सांगून स्थानिक घडलेल्या घटनेबाबत त्यांनी माहिती दिली.  
कार्यक्रमात कर सल्लागार नानकांनी यांनी जिएसटी व इतर करांबाबत व्यापा:यांना सविस्तर माहिती दिली . जिल्हाध्यक्ष मनोज श्रॉफ यांनी सांगितले, आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो त्याचे ऋण फेडायचे आहे ही भावना प्रत्येकाने ठेवली पाहिजे. आपला व्यवसाय प्रतिष्ठेचा आहे. सोळा संस्कारांपैकी एक संस्कार हा सोनारांशिवाय होत नाही. चाकोरीबद्ध व्यवसायातून बाहेर पडून आपल्यात बदल करणे आवश्यक आहे. 
नाशिककर यांनी तूच तुज्या जीवनाचा शिल्पकार या उक्तीप्रमाणे आपण आपल्या शहरात चांगला व्यवसाय करावा असे आवाहन केले. प्रास्ताविक स्वप्नील सोनार, परिचय जगदीश सोनी तर सूत्रसंचालन योगेश सोनार व आभार हर्षल सोनार यांनी मानले.
कार्याध्यक्ष जितेंद्र सोनार, उपाध्यक्ष जगदीश सोनी, हिरालाल सोनी ,आनंद सोनार, विनोद सोनार, अल्पेश सोनार, प्रदीप सोनार, स्वप्निल सोनी, विनोद सोनार, नंदकिशोर थोरात, संजय श्रॉफ, पंकज सोनार, संजय सोनार, अजय सोनार, योगेश सोनार आदी उपस्थित होते.

संमेलनानिमित्त जिल्हाभरातील सराफा व्यावसायिक आपले प्रतिष्ठाने बंद ठेवून नंदुरबारात आले होते. त्यामुळे नंदुरबार शहरासह शहादा, नवापूर, अक्कलकुवा, तळोदा येथील सराफा दुकाने दिवसभर बंद होती. परिणामी सराफा बाजारांमध्ये शुकशुकाट दिसून येत होता. परिणामी    लाखोंची उलाढाल देखील ठप्प झाली होती. सराफा व्यावसायिकांची एकी या निमित्ताने दिसून आल्याचे चित्र होते. 
 

Web Title: Saraf is offended by the excesses of section 411

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.