सन्मित्र क्रीडा मंडळातर्फे तालुक्यातील उपक्रमशील शिक्षकांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:36 IST2021-09-07T04:36:51+5:302021-09-07T04:36:51+5:30

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संसर्गजन्य साथीच्या काळात ही शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात निस्वार्थ भावनेने व निष्ठेने अध्यापन आणि ...

Sanmitra Krida Mandal honors enterprising teachers in the taluka | सन्मित्र क्रीडा मंडळातर्फे तालुक्यातील उपक्रमशील शिक्षकांचा गौरव

सन्मित्र क्रीडा मंडळातर्फे तालुक्यातील उपक्रमशील शिक्षकांचा गौरव

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संसर्गजन्य साथीच्या काळात ही शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात निस्वार्थ भावनेने व निष्ठेने अध्यापन आणि कोरोना प्रतिबंध जन जागरणाचे भरीव कार्य करणाऱ्या उपक्रमशिल व प्रज्ञावंत शिक्षकांना जनगौरव आदर्श शिक्षक पुरस्काराने दरवर्षी गौरवण्यात येते. यावर्षीदेखील आदर्श शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या वेळी शिक्षकांकडून कोणताही प्रस्ताव न मागविता परिसरातील जनमानसातून व सन्मित्र क्रीडा मंडळाच्या निवड समितीने ही निवड केली आहे. हे या पुरस्काराचे खास वैशिष्ट्य आहे. आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकांमध्ये रवींद्र भाईदास पाटील ( जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, प्रकाशा), चतुर राजाराम पाटील (वल्लभ विद्यामंदिर, पाडळदा), सदाशिव निंबा निकम (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, काकर्दे), पुष्पा गणेश पाटील (व्हाॅलंटरी प्राथमिक महिला मंडळ शाळा, शहादा), स्नेहल सर्जेराव गुगळे (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कलसाडी), यशवंत अमृतराव क्षीरसागर (म्युनिसिपल न्यू इंग्लिश स्कूल शहादा), प्रमोद भगवान मोरे (माध्यमिक विद्यालय, दामळदा), किरण युवराज सोनवणे ( विकास विद्यालय, शहादा), श्रीकृष्ण रामदास पाटील (सातपुडा विद्यालय, लोणखेडा), दीपक जयसिंग गिरासे (किसान विद्यालय, असलोद), कमलेश एकनाथ पटेल (विकास विद्यालय, शहादा), भावना रमेश मिश्रा (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टेंभातर्फे सारंगखेडा), हेमलता विलास पाटील (विकास माध्यमिक विद्यालय, शहादा),

सुनंदा अरुण तांबोळी (लाडकोरबाई प्राथमिक शाळा, शहादा), खान अबरार अफजल (वसंतराव नाईक हायस्कूल, शहादा), स्मिता शामकांत आहिरराव (नगर पालिका शाळा क्रमांक़ तीन, शहादा), श्रद्धा विजय पवार (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मंदाणा), योगराज देवीदास खेडकर (महावीर इग्लिश स्कूल, शहादा), बिलकिस आसमानी (सर सैय्यद उर्दू गर्ल्स स्कूल, शहादा), बन्सीलाल लालसिंग तडवी ( नगर पालिका शाळा क्रमांक १६, शहादा), दिपाली युवराज पाटील (प्राथमिक शाळा, खेडदिगर), श्वेता बिपीन गलराह (मिशन इंग्लिश मिडियम स्कूल, शहादा), मनिषा रामराव आमले (सरस्वती विद्यामंदीर, डोंगरगाव), शहादा शहर व शहादा तालुक्यातील पुरस्कार प्राप्त सर्व आदर्श शिक्षकांना लवकरच मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

पुरस्कार समारंभ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व शासनाच्या नियमानुसार आयोजित करण्यात येईल. असे सन्मित्र बहुऊद्देशिय क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रा.ज्ञानी कुलकर्णी, उपाध्यक्ष ॲड.राजेश कुलकर्णी, सचिव प्रा.संपत कोठारी, ज्ञानेश्वर चौधरी, प्रतिमा माळी, प्रविणा कुलकर्णी, प्रतिभा बोरसे, कल्पेश पटेल, प्रा.आर.टी. पाटील, समीर जैन, रोहन माळी, ॲड.प्रभू गुरव संचालकातर्फे जाहीर करण्यात आले आहे.

Web Title: Sanmitra Krida Mandal honors enterprising teachers in the taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.