संजय गांधी निराधार योजनेच्या बैठकीत १३८ प्रकरणे मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:23 IST2021-05-28T04:23:24+5:302021-05-28T04:23:24+5:30

शहादा तहसील कार्यालयाच्या सभागृहात संजय गांधी निराधार कमिटीचे अध्यक्ष सत्येन वळवी यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या ...

Sanjay Gandhi Niradhar Yojana meeting approves 138 cases | संजय गांधी निराधार योजनेच्या बैठकीत १३८ प्रकरणे मंजूर

संजय गांधी निराधार योजनेच्या बैठकीत १३८ प्रकरणे मंजूर

शहादा तहसील कार्यालयाच्या सभागृहात संजय गांधी निराधार कमिटीचे अध्यक्ष सत्येन वळवी यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी बैठकीस तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, शासकीय सदस्य तथा गटविकास अधिकारी आर.बी. घोरपडे, सदस्या कमला ठाकरे, अब्दुल शहा, अरुण चौधरी, ईश्वर पाटील, लगन पावरा, सुरेंद्र पवार, माधवराव पाटील, गणेश चित्रकथे, नायब तहसीलदार पी.सी. धनगर आदी उपस्थित होते.

संजय गांधी निराधार योजने अंतर्गत विविध योजनांचे अर्ज मंजूर करण्यात आले व काही त्रुटी असणारे अर्ज अर्जदारांकडून पूर्तता करण्यात येऊन सादर करण्यात येतील, अशी माहिती संजय गांधी निराधार कमिटीचे सचिव तथा तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी दिली. बैठकीत संजय निराधारचे १५, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळचे ४८, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतनचे ६८ तर श्रावण बाळ योजनेचे सात तसेच राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतनचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. दर महिन्याला संजय गांधी निराधार योजनेची बैठक होणार असल्याचे या वेळी ठरविण्यात आले. या बैठकीसाठी अव्वल कारकून महेंद्र पाठक, लिपिक रामदास पवार, सोनाली फुलपगारे, सहायक एस.डी. मुळतकर, संगणक सहायक प्रेमसिंग गिरासे, मायाबाई पाटील आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Sanjay Gandhi Niradhar Yojana meeting approves 138 cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.