जैविक कचरा जाळून ‘धुर’ही होतो सॅनेटाईज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 12:52 PM2020-08-06T12:52:05+5:302020-08-06T12:52:12+5:30

भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोविड केअर सेंटर आणि कोविड हॉस्पिटल याठिकाणी वापरून झालेले जैविक मटेरीयल ...

Sanitation is done by burning organic waste | जैविक कचरा जाळून ‘धुर’ही होतो सॅनेटाईज

जैविक कचरा जाळून ‘धुर’ही होतो सॅनेटाईज

googlenewsNext

भूषण रामराजे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोविड केअर सेंटर आणि कोविड हॉस्पिटल याठिकाणी वापरून झालेले जैविक मटेरीयल कालांतराने जैविक कचरा म्हणून टाकून देण्यात येते़ या जैविक कचऱ्यातून संसर्ग होण्याचा धोका असल्याने त्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावत तो जाळल्यानंतरही त्यातून निघणाºया धूरावर प्रक्रिया करण्याची पद्धत अवलंबली जात आहे़ यातून कोरोना या आजाराला अति गांभिर्याने घेण्याची गरज आहे़
‘लोकमत’ने नंदुरबार येथील एकलव्य रेसिडेन्शियल आणि जिल्हा रुग्णालयातील कोविड केअर सेंटरमध्ये वापलेले पीपीई कीट, हँडग्लोव्हज, मास्क, इंजेक्शन सिरींज, बाधितांनी वापरलेल्या वस्तू, जेवणाच्या प्लेट्स, चहाचे कप यासह विविध वस्तूंची विल्हेवाट कशी लावण्यात येते याचा आढावा घेतला़
हा कचरा जिल्हा रुग्णालयात नियुक्त जैविक कचरा व्यवस्थापन खाजगी कंपनीकडून शहराबाहेरील निर्जन ठिकाणी तयार करण्यात आलेल्या ठिकाणी नेऊन त्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे़

जिल्हा रुग्णालय आणि कोविड केअर सेंटर येथे पिवळ्या रंगाच्या हाय क्वालिटी पॉलिथिन बँगांमध्ये हा कचरा जमा करण्यात येतो़ कचरा जमा करण्यात आल्यानंतर निर्धारित वेळेत नियुक्त केलेल्या ठेकेदाराकडून बंदिस्त असे वाहन आणून त्यात तीन कर्मचारी कचरा संकलित करुन त्याची शहराबाहेर तयार करण्यात आलेल्या बायमेडिकल वेस्ट प्लान्टमध्ये विल्हेवाट लावण्यात येते़

दोन चेंबरमध्ये होते प्रक्रिया
च्दोन चेंबरमध्ये गरम करुन जाळण्यात आलेल्या बायोमेडिकल वेस्टमधून निघणारा कार्बन डायआॅक्साईड वातावरणात जाऊन घातक होण्याची चिन्हे असल्याने वातावरणात धूर फेकणाºया चिमण्यांमध्ये पाणी सोडण्यात येते़ पाणी आणि धूर एकावेळी बाहेर पडत असल्याने घातक कार्बन डाय आॅक्साईडमधील इतर विषारी द्रव्यांचे उत्सर्जन थांबत आहे़ यामुळे हवा प्रदूषित होण्याचा धोका टाळला जात आहे़ या संपूर्ण प्रक्रियेसाठी दोन चेंबर आणि एक कचरा जाळणारे व हीट देणारे मशिन याठिकाणी लावण्यात आले आहे़ वेळोवेळी या मशिन आणि चेंबरची तपासणी करुन त्यांची देखभाल दुरूस्ती करण्यात येत आहे़

१२० मायक्रोग्रॅम मीटर क्यूब अशी पातळी
हवेत सोडण्यात येणाºया धुरामुळे वायूप्रदूषण होण्याचे निर्धारित प्रमाण १२० मायक्रोग्रॅम मीटर क्यूब असे ठेवण्यात आले आहे़ यापुढे आकडा वाढल्यास हवेच्या प्रदूषणात वाढ होते़ यासाठी कचरा जाळण्यात येणाºया प्लांटमध्ये आॅनलाईन मॉनिटरींग सिस्टीम लावण्यात आली आहे़
कचरा जाळला जात असताना बाहेर पडणाºया धुराची धोकेदायक पातळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी धुळे, मुंबई आणि दिल्लीत बसून पाहू शकतात़ आजवर १२० च्या पातळीपुढे आकडेवारी गेली नसल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून देण्यात आली आहे़
दर दिवशी सुमारे ३४० किलो कचरा हा जिल्हा रुग्णालय आणि कोविड केंअर सेंटर येथील तर शहरातील इतर खाजगी रुग्णालयातूनही दर दिवशी किमान ३०० किलो कचरा गोळा करुन त्याची विल्हेवाट लावण्यात येत आहे़
शहराबाहेर सुरू असलेल्या या प्लांटमधून साधा राखेचा कणही बाहेर पडू नये यासाठी दक्षता घेतली जात असून बाहेर पडण्यापूर्वी कर्मचाऱ्यांना सॅॅनेटाईज केले जात आहे़

कचरा गोळा करणारे सर्व कर्मचारी तसेच गावाबाहेरील प्लांटमध्ये कचरा जाळून त्यावर पुन्हा प्रक्रिया करतेवेळी कर्मचारी पीपीई कीट परीधान करण्यात येतात़ त्यांच्याकडून वापरण्यात आलेल्या पीपीई कीट आणि हँडग्लोव्हचीही येथेच विल्हेवाट लावण्यात येत आहे़

Web Title: Sanitation is done by burning organic waste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.