साने गुरुजी मित्रमंडळातर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:21 IST2021-06-20T04:21:11+5:302021-06-20T04:21:11+5:30

वर्षभरापासून कोरोनामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याची सुरुवात झाली. मात्र ग्रामीण व दुर्गम भागातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांकडे ...

Sane Guruji Mitramandal distributes educational materials to students | साने गुरुजी मित्रमंडळातर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

साने गुरुजी मित्रमंडळातर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

वर्षभरापासून कोरोनामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याची सुरुवात झाली. मात्र ग्रामीण व दुर्गम भागातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन, लॉपटॉप, नेटवर्क नाही व मोबाइल रिचार्जसाठी लागणारा खर्च अशा अनेक अडचणी असल्याने हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. त्यासाठी साने गुरुजी मित्रमंडळातर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले. यात मराठी अंक, मुळाक्षरे, पाढे यांचा तक्ता, वह्या,पेन, पेन्सिल, खोडरबर, शॉपनर आदींचा समावेश आहे. कार्यक्रमास हैदर नुरानी, साने गुरुजी मित्रमंडळाचे माणक चौधरी, लोणखेडा जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष गुलाबराव पवार, जायन्ट्सच्या आशा चौधरी, विस्तार अधिकारी एस. एस. तावडे, मुख्याध्यापक धरमदास पाटील, रवींद्र नानावटकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक गुलाबराव पवार यांनी केले. सूत्रसंचालन गौरी नानावटकर, तर आभार धरमदास पाटील यांनी मानले. कार्यक्रमासाठी श्यामलाल पावरा, मनीषा कुंदे, अर्जुन आव्हार आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Sane Guruji Mitramandal distributes educational materials to students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.