वाळू वाहतूक करणा:या तीन वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 11:36 IST2019-07-24T11:36:43+5:302019-07-24T11:36:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : गुजरात राज्यातील वाळू प्रकाशा ता़ शहादा मार्गाने मालेगावडके जात असल्याचे दिसून आल्यानंतर प्रशासनाने दंडात्मक ...

Sand Transport: Action on these three vehicles | वाळू वाहतूक करणा:या तीन वाहनांवर कारवाई

वाळू वाहतूक करणा:या तीन वाहनांवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : गुजरात राज्यातील वाळू प्रकाशा ता़ शहादा मार्गाने मालेगावडके जात असल्याचे दिसून आल्यानंतर प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली़ तहसीलदार मनोज खैरनार यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई झाली़ वाहनांमध्ये 75 टन वाळू असल्याची माहिती आह़े 
प्रकाशा येथे सोमवारी रात्री आठ वाजता मंडळाधिकारी मुकेश चव्हाण, तलाठी डी.एम. चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल वंतू गावीत आणि पंकज जिरेमाळी यांचे पथक तळोदा चौफुलीवर तपासणी करत असताना  एम़एच़ 20 डीई 6807, एम़एच़ 18 एए 9325, एम़एच 43 वाय 8890 या वाहनांमध्ये अवैध वाळू भरल्याचे दिसून आल़े ही वाहने गुजरात राज्यातून महाराष्ट्रात आली होती़ महसूली पथकाने पावतीची मागणी केली असताना चालकाने गुजरात राज्याची पावती दाखवली होती़ ही वाहने मालेगाव येथे जात असल्याची माहिती देण्यात आली आह़े वाळू अवैध असल्याने तिघा वाहनांना जप्त करुन कारवाई करण्यात आली़ प्रशासनाच्या कारवाईने वाळू वाहतूक करणा:यांचे धाबे दणाणले आह़े वाहनधारकांकडून किमान तीन लाख रुपयांर्पयत दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े वाहने जप्त करुन प्रकाशा येथील पोलीस दूरक्षेत्रावर लावण्यात आली आहेत़ 
 

Web Title: Sand Transport: Action on these three vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.