शहाद्यात बिनशेती परवान्याचा गैरवापर केल्याने साॅ मिल सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:59 IST2021-03-04T04:59:29+5:302021-03-04T04:59:29+5:30

यांतर्गत मंगळवारी अनिता नानूराम राठोड यांच्या मालकीची साॅ मिल सील करण्यात आली. जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र ...

Samal mill sealed for misuse of non-agricultural license in Shahada | शहाद्यात बिनशेती परवान्याचा गैरवापर केल्याने साॅ मिल सील

शहाद्यात बिनशेती परवान्याचा गैरवापर केल्याने साॅ मिल सील

यांतर्गत मंगळवारी अनिता नानूराम राठोड यांच्या मालकीची साॅ मिल सील करण्यात आली. जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भारूड यांनी जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांतर्गत शेतजमिनीचा वापर निवासी कारणासाठी बिनशेतीत बदल करून त्यावर औद्योगिक व्यवसाय सुरू करणाऱ्यांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार जिल्ह्यात कामकाज सुरू असून शहाद्याचे तहसीलदार डाॅ. मिलिंद कुलकर्णी यांनी शहादा शहरातील २२ जणांना याप्रकरणी नोटिसा बजावल्या होत्या. या सर्व २२ जणांकडून नियमांचा भंग करत बिनशेती परवाना घेत त्याजागी औद्योगिक व व्यावसायिक कामकाज सुरू करण्यात आले होते. त्यांना नोटिसा बजावल्यानंतर दंडाची रक्कम भरण्यासाठी प्रशासनाकडून सूचना करण्यात येत होती. परंतु, संबंधितांनी त्याकडे दुर्लक्ष करत नोटिसांना केराची टोपली दाखविली होती. यातील काहींनी मात्र दंडाची रक्कम भरत कारवाईपासून सुटका करवून घेतली होती. परंतु, वारंवार सूचना करूनही दंड न भरणाऱ्या इतरांकडे प्रशासनाने दंडाचा तगादा लावला होता. यातून मंगळवारी शहादा मंडळाधिकारी प्रमोद अमृतकर यांनी शहादा येथील अनिता नानूराम राठोड यांच्याकडे ६८ हजार ४६२ रुपये दंड शिल्लक असल्याचे सूचित केले हाेते. परंतु, रक्कम भरण्यास अनिता राठोड यांच्याकडून नकार आल्याने बिनशेती परवाना घेत सुरू केलेल्या जागेवरील साॅ मिल सील करण्याची कारवाई करण्यात आली. याबाबत तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांच्याशी संपर्क केला असता, संबंधितांनी दंड भरल्यानंतरच सील काढले जाईन, जागा मालकाने सील तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास फौजदारी गुन्हे दाखल करू, असे सांगितले.

Web Title: Samal mill sealed for misuse of non-agricultural license in Shahada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.