तब्बल दोन लाखाला शहाद्याच्या बोकडची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:33 IST2021-02-11T04:33:17+5:302021-02-11T04:33:17+5:30

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील बोकड पालन करणाऱ्या राजीकभाई बेकरीवाले यांच्याजवळ असलेल्या राजस्थानी कोटा जातीचा बोकड चक्क दोन लाख १० ...

Sales of martyrdom goats for Rs | तब्बल दोन लाखाला शहाद्याच्या बोकडची विक्री

तब्बल दोन लाखाला शहाद्याच्या बोकडची विक्री

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील बोकड पालन करणाऱ्या राजीकभाई बेकरीवाले यांच्याजवळ असलेल्या राजस्थानी कोटा जातीचा बोकड चक्क दोन लाख १० हजार रुपये किमतीला विकला गेल्यानंतर हा बोकड चर्चेचा विषय ठरला आहे.

राजस्थानी कोटा जातीच्या बोकडचे वैशिष्ट्य कोटा सारकी प्रजातीमध्ये कलर पूर्णपणे पांढरा शुभ्र व सिगं व पायाची खुरसुद्धा पांढरे, काचे सारकी पाढंरी शुभ्र व शरीराची कातडी गुलाबी रंगाची आणि सिगांचे आकार हरीणसारखे व मोठे शिगं असून, आकर्षित दिसणारे व कमी वयामध्ये जास्त प्रमाणात वाढ झालेला.

बोकडाचा रोजचा खुराक

सकाळी एक किलो गहू, किंवा चना, मकासह दैनंदिन जीवनात चालणारा चारा, सायंकाळी परत सकाळसारखे अन्न व रोज रात्री दीड ते दोन लीटर दूध अधूनमधून चांगल्या दर्जाचे फळ आणि संपूर्ण लसीकरण करण्यात येत असल्याची माहिती बोकड मालकाने दिली.

हा बोकड एशिया खंडातील सर्वात मोठी मंडी देवनार बकरा मंडी येथे शहादा येथील विक्रेता सिंकदर शाह विक्रीसाठी घेऊन गेले असता त्यांची किंमत तब्बल दोन लाख १० हजार रुपये बोली लावून विक्री झाली.

विक्रेता सिकंदर शाह शहादा यांनी विक्री करून नंदुरबार जिल्हासारखे दुर्गम भागातून थेट एशिया खंडाच्या सर्वात मोठी मंडी देवनार बकरा मंडी येथे हा कोटा प्रजातीचा बोकड विकून नंदुरबार जिल्ह्याचे नाव थेट देवनार मंडी व संपूर्ण भारतभर प्रचलित केले.

बोकड विक्रेता सिंकदर शाह यांचे नंदुरबार जिल्हाचे सर्व शेळी फार्मर करीम हाजी साहब अक्कलकुवा, आकाश पावरा प्रतापपूर, विनोद पावरा रामपूर, अमन तेली इस्लामपूर, स्वप्नील पावरा म्हसावद, शहादा येथील बोकड मालक राजीक बेकरीवाले यांनी आभार मानले.

Web Title: Sales of martyrdom goats for Rs