शिळा पाव विक्री, दोघांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 12:41 IST2020-10-29T12:41:45+5:302020-10-29T12:41:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : किराणा दुकानातून शिळा ब्रेड विक्री केल्याने एकास त्रास झाला. त्यांच्या फिर्यादीवरून देवळफळी, ता.नवापूर येथील ...

Sale of stale bread, crime against both | शिळा पाव विक्री, दोघांविरुद्ध गुन्हा

शिळा पाव विक्री, दोघांविरुद्ध गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : किराणा दुकानातून शिळा ब्रेड विक्री केल्याने एकास त्रास झाला. त्यांच्या फिर्यादीवरून देवळफळी, ता.नवापूर येथील दोघांविरुद्ध नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
पोलीस सूत्रांनुसार, देवळफळी येथील अल्पेश तुकाराम कोकणी व राकेश तुकाराम कोकणी यांनी त्यांच्या किराणा दुकानातून मुदत संपलेले ब्रेड विकले. त्यामुळे देवळफळी येथील दिपांजली दिवानजी गावीत यांना त्रास झाला. त्यांनी याबाबत ब्रेडच्या खोक्यावर उत्पादीत व मुदत संपल्याची तारीख पाहिल्यावर त्यांना एक दिवसांपूर्वीच त्याची मुदत संपल्याचे लक्षात आले. त्यामुळेच आपल्याला त्रास झाल्याचा त्यांनी दावा केला. त्यामुळे त्यांनी याबाबत पोलीसात तक्रार केली. 
त्यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध नवापूर पोलीसात अपायकारक खाद्य पदार्थ विक्री केल्याप्रकरणी नवापूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार ठाकुर करीत आहे. 

Web Title: Sale of stale bread, crime against both

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.