एकाच प्लॉटची पाच जणांकडून खरेदी-विक्री; फसवणुकीचा गुन्हा दाखल
By मनोज शेलार | Updated: February 4, 2024 19:17 IST2024-02-04T19:16:57+5:302024-02-04T19:17:10+5:30
मिळकतीचे खोटे आणि बनावट कागदपत्रे तयार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

एकाच प्लॉटची पाच जणांकडून खरेदी-विक्री; फसवणुकीचा गुन्हा दाखल
नंदुरबार : एकच प्लॉट पाचजणांच्या नावावर करून फसवणूक केल्याप्रकरणी मूळ मालकाच्या फिर्यादीवरून पाचजणांविरुद्ध नंदुरबार शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांनुसार, रूपकुमार बन्सीलाल वडनगरे (६५, रा.बुलढाणा) यांचा नंदुरबारात प्लॉट आहे. परंतु त्यांना न विचारता २०१५ ते २०२१ या कालावधीत पाचजणांनी तो प्लॉट एकमेकांना विकल्याचा प्रकार वडनगरे यांच्या लक्षात आला. निबंधक कार्यालयात खोटी कागदपत्रे सादर करून हा प्रकार करण्यात आल्याचे समोर आले आहे. मिळकतीचे खोटे आणि बनावट कागदपत्रे तयार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर रूपमकुमार वडगनरे यांनी शनिवारी नंदुरबार शहर पोलिसांत फिर्याद दिली. त्यावरून राजेश काशीनाथ रघुवंशी (५८), विलास विजयसिंग रघुवंशी (५५), संतोष नारायण चाैधरी (५३, सर्व रा.नंदुरबार), बळीराम रमेश पटेल (४३,रा.कोठली) व आणखी एकजण (रा.नंदुरबार) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक नंदा पाटील करीत आहे.