३५ आश्रमशाळांमध्ये साकारतेय लॅब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 12:31 IST2020-07-12T12:31:40+5:302020-07-12T12:31:46+5:30

हंसराज महाले । लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : मार्इंडस्पार्क लर्निंग उपक्रमाअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील ३५ शासकीय आश्रमशाळांमध्ये मार्इंडस्पार्क लॅब निर्माण ...

Sakartey Lab in 35 Ashram Schools | ३५ आश्रमशाळांमध्ये साकारतेय लॅब

३५ आश्रमशाळांमध्ये साकारतेय लॅब

हंसराज महाले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : मार्इंडस्पार्क लर्निंग उपक्रमाअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील ३५ शासकीय आश्रमशाळांमध्ये मार्इंडस्पार्क लॅब निर्माण केल्या जात असून त्यांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मार्इंडस्पार्क लर्निंग उपक्रमामुळे आश्रमशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तज्ज्ञ शिक्षकांकडून आॅनलाईन अध्यापन केले जाणार आहे.
शिक्षण क्षेत्रात झपाट्याने बदल होत असताना जिल्ह्यातील आश्रमशाळेत शिकणारे विद्यार्थी मात्र पारंपरिक पद्धतीने शिक्षण घेत असल्याचे दिसल्याचा अनुभव आहे. आश्रमशाळेत शिकणाºया आदिवासी विद्यार्थ्यांना पारंपरिक व चाकोरीबद्ध अध्यापन प्रक्रियेच्या पलीकडे जाऊन अद्ययावत शिक्षण पद्धतीचा वापर करून शिक्षण मिळावे यासाठी युनिसेफ, नॅशनल स्टॉक एक्सचेंज फाऊंडेशन, महाराष्ट्रात शासनाचा आदिवासी विकास विभाग व एज्युकेशन एनिशिएटीव्ह संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार जिल्ह्यातील ३५ आश्रमशाळांमध्ये ‘मार्इंडस्पार्क लर्निंग’ हा उपक्रम कार्यन्वित केला आहे. या उपक्रमासाठी नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील २८ तर तळोदा प्रकल्पातील सात आश्रमशाळांची निवड करण्यात आली आहे.
या उपक्रमात पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दररोज अर्धा तास मराठी, गणित व इंग्रजी या विषयांचे तज्ज्ञ आॅनलाईन अध्यापन करणार आहेत. या अध्यापनात प्रामुख्याने विद्यार्थ्यांचे मूलभूत संबोध स्पष्टता, कौशल्य विकास व अध्ययन गती वाढविणे यांना प्राधान्य असणार आहे. आॅनलाईन अध्ययनासाठी या उपक्रमासाठी निवड करण्यात आलेल्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्येचे प्रमाणात प्रती शाळा १९ ते ३० लॅपटॉप वितरित करून या शाळांमध्ये ‘मार्इंडस्पार्क लॅब’ उभारली जात आहेत. यासाठी शाळेतील एका खोलीत टेबल, स्टूल यांच्यासह इंटरनेट व विद्युत जोडणी अशा सर्व सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. यातील २० शाळांमध्ये लॅब निर्मितीचे काम पूर्ण झाले असून उर्वरित शाळांचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासाठी लागणारा निधी नॅशनल स्टॉक एक्सचेंज फाऊंडेशनच्या सीएसआर फंडातून उपलब्ध करून देण्यात आला आहे. ३५ आश्रमशाळांमध्ये एकूण ७५९ लॅपटॉप व ४६ टॅब व ३५ संगणक यासह इतर साहित्य शाळांना देण्यात आले आहेत.
दरम्यान, मार्इंडपार्क लॅर्निंग हा उपक्रम मार्च महिन्यात पूर्णपणे कार्यान्वित करण्यात येणार होता. मात्र कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे होळीनंतर आश्रमशाळेतील विद्यार्थी शाळेतच येऊ न शकल्यामुळे हा उपक्रम लांबणीवर पडला. मात्र यावर मार्ग काढत आदिवासी विकास विभाग व सहभागी सहकारी संस्थेने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडे स्मार्ट फोन आहेत, त्यांच्या फोनवर लॉगिन आयडी व पासवर्ड तयार करून शक्य आहे तेवढ्या विद्यार्थ्यांना मार्इंडस्पार्क लर्निंगचा लाभ देण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती देण्यात आली.

या आश्रमशाळांमध्ये असणार मार्इंडस्पार्क लॅब
मार्इंडस्पार्क या उपक्रमाअंतर्गत नंदुरबार प्रकल्पातील आश्रमशाळामध्ये धनराट, वडकळंबी, खेकडा, कोळदा, पानबारा, खडकी, नावली, आमसरपाडा, बंधारे, निजामपूर, ढोंगसागाळी, देवमोगरा, बोरचक, भादवड, कोठली, सुलतानपूर, गणोर, राणीपूर, रामपूर, नवलपूर, चांदसैली, चिरखान, भालेर, खोक्राळे, नंदुरबार, वाघाळे ठाणेपाडा या आश्रमशाळांचा समावेश आहे तर तळोदा प्रकल्पातील डाब, बिजरी, बोरद, अलिविहीर, राणीपूर, सलसाडी, लोभाणी या सात आश्रमशाळांचा समावेश आहे. शाळांची निवड करताना नेटवर्क कनेक्टीव्हीटी असणाºया शाळांना प्राधान्य देण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली. सलसाडी व कोळदा येथील आश्रमशाळेत लॅब निर्मितीसाठी जागेची अडचण असल्याने या शाळांना मार्इंडस्पार्क लॅर्निंगसाठी प्रत्येकी २३ टॅब देण्यात आले आहेत.

Web Title: Sakartey Lab in 35 Ashram Schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.