गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून सुखरूप प्रसूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:19 IST2021-07-12T04:19:55+5:302021-07-12T04:19:55+5:30

नंदुरबार : मातेच्या प्रसूतिमार्गात असलेल्या अडसराची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी करून बाळाला वाचविण्यात सातपुड्यातील दुर्गम भागातील मोरंबा आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना ...

Safe delivery by complicated surgery | गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून सुखरूप प्रसूती

गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून सुखरूप प्रसूती

नंदुरबार : मातेच्या प्रसूतिमार्गात असलेल्या अडसराची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी करून बाळाला वाचविण्यात सातपुड्यातील दुर्गम भागातील मोरंबा आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना यश आले. चार किलो वजन असलेल्या बाळाची व आईचीही प्रकृती ठणठणीत आहे.

रतनबारा (ता. अक्कलकुवा) येथील पहिल्या खेपेच्या मातेची गुंतागुंतीची प्रसूती होती. मातेच्या कटिराची रुंदी कमी असल्याने व बाळ चार किलोंचे असल्याने प्रसूतिमार्गात ते अर्धा तासभर अडकून पडले होते. मात्र डाॅ. प्रमोद सोनवणे व आरोग्यसेविका पी. टी. वसावे यांनी युक्तपूर्वक (फंडल व इपि) प्रसूती करून चार किलोंचे स्त्रीजातीचे बाळ सुखरूप बाहेर काढले. मात्र बाळाने आईच्या पोटातच शी करून ती गिळून घेतली होती. त्यामुळे ते रडत नव्हते. तरीही बाळाला कृत्रिम श्वासोच्छ्वास, आदी सोपस्कार पार पाडत अखेर रडवलेच. त्यामुळे प्रसूतिकक्षातील सर्वांच्या चेहऱ्यांवर हास्य उमटले.

बाळाची व आईची प्रकृती ठणठणीत आहे. जिल्हा आरोग्याधिकारी डाॅ. नितीन बोड, तालुका आरोग्याधिकारी डाॅ. स्वप्निल मालखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली व वैद्यकीय अधिकारी डाॅ. प्रफुल्ल पठाडे, डाॅ. योगेश्वर पाटील यांचे सहकार्य मिळाले.

Web Title: Safe delivery by complicated surgery