शहादा आगारात एस. टी. इंटकची वार्षिक सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:11 IST2021-02-05T08:11:02+5:302021-02-05T08:11:02+5:30
अध्यक्षस्थानी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.सुरेश नाईक होते. बैठकीला पं. स. सदस्य डॉ.जाधव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेश सचिव तुषार गोसावी, विभागीय ...

शहादा आगारात एस. टी. इंटकची वार्षिक सभा
अध्यक्षस्थानी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.सुरेश नाईक होते. बैठकीला पं. स. सदस्य डॉ.जाधव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेश सचिव तुषार गोसावी, विभागीय अध्यक्ष रामेश्वर चत्रे, विभागीय सचिव चंद्रकांत गोसावी, गोपाल ठाकरे, विकास गवळी, अनिल पाटील, बापूराव कोळी, आर. के. कुवर, के. झेड. मोरे, माधुरी पाडवी आदी उपस्थित होते. बैठकीदरम्यान सेवानिवृत्त झालेले चालक व वाहक भगवान मालचे, बी. एस. नाईक, मुरलीधर वळवी, बंडू पानपाटील यांचा सत्कार करण्यात आला.
नूतन कार्यकािरणी अशी : आगार अध्यक्ष नंदशेखर बावीस्कर, कार्याध्यक्ष एम.जे. खान, सचिव चंपालाल डुडवे, खजिनदार मगन पावरा, देवेंद्र पानपाटील यांची निवड करण्यात आली. सूत्रसंचालन बापूराव कोळी यांनी तर आर. के. कुवर यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी भरत डुडवे, भारत कोळी, विजय धनगर, रमेश बडोदे, भैय्या सूर्यवंशी, आर.जे. शिरसाठ, नाना रणदिवे, बी. एच. पिंजारी, के.सी. येवले, एस.टी. ठाकरे, रणसिंग पावरा आदींनी परिश्रम घेतले.