शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
4
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
5
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
6
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
7
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
8
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
9
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
10
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
11
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
12
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
13
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
14
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
15
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
16
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
17
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
18
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
19
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
20
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी

तापीच्या पवित्र स्नानासाठी उसळली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2019 12:03 PM

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : मंगळी ऋषीपंचमीनिमित्त येथील सूर्यकन्या तापी नदीच्या पात्रात स्नान करण्यासाठी महिला भाविकांनी मोठय़ा प्रमाणात हजेरी ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : मंगळी ऋषीपंचमीनिमित्त येथील सूर्यकन्या तापी नदीच्या पात्रात स्नान करण्यासाठी महिला भाविकांनी मोठय़ा प्रमाणात हजेरी लावली होती. केदारेश्वर, काशीविश्वेश्वर, पुष्पदंतेश्वर, संगमेश्वर, मंदिरावर दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. त्यामुळे परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते.सविस्तर वृत्त असे की, यंदा ऋषीपंचमी मंगळवारी आल्याने ‘मंगळी ऋषीपंचमी’ म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे. याच दिवशी महिला ऋषीपंचमीच्या व्रताला प्रारंभ करतात तर काही महिला संकल्प सोडून विराम देतात.  म्हणून यावर्षी महिलांची प्रचंड गर्दी दिसून आली. ऋषीपंचमीला तापी नदीत स्नान केल्यावर पुण्य लाभते, अशी महिला भाविकांची श्रद्धा असल्याने मंगळवारी पहाटेपासूनच महिला भाविकांची गर्दी उसळली होती. नंदुरबार, तळोदा, शहादा रस्ते वाहनांच्या गर्दीने फुलून गेले होते. गुजरात व मध्य प्रदेशातूनही महिला भाविक आल्या होत्या.तापी नदीपात्रात परंपरेनुसार तीळ व आवळ्याची भुकटी  लावून महिलांनी स्नान केले. आघाडा वनस्पती व समीधाच्या काडय़ांनी दंतन करून आयुबल हा मंत्र म्हणून प्रार्थना केली. स्नान झाल्यावर महिलांनी ब्रrावृंदाकडून अरुंधती व सप्तऋषींची कथा श्रवण केली. ऋषीपंचमीचे व्रत केल्यास पापापासून मुक्ती मिळते, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे महिलांनी ब्राrाणांकडून अरुंधती, काश्यप, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम ऋषी, जमदग्नी, वशिष्ट, अत्री या ऋषींची पूजा करून कथा श्रवण केली व सप्त कडधान्य दान केले. कथा श्रवण झाल्यावर महादेवावर अभिषेक करून घेतला. त्यानंतर श्रीक्षेत्र केदारेश्वर, काशीविश्वेश्वर, पुष्पदंतेश्वर, काशीचा ओटा, संगमेश्वर मंदिरावर दर्शनासाठी दिवसभर रांगा लागल्या होत्या. दर्शनानंतर महिलांनी मंदिर परिसरात सावलीच्या ठिकाणी एकत्र बसून फराळ केला.यात्रेचे स्वरूपयेथील सर्वच मंदिर परिसरात पूजेचे साहित्य, नारळ, हळद-कुंकू, फुलहार उपहारगृहे, खेळणी विक्रेते, रसवंती, विविध वस्तू विक्रेते, विविध देवदेवतांचे फोटो, मूर्ती विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती. त्यामुळे मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते.वाहन तळ नियोजनवाहन तळाचे नियोजन योग्य पद्धधतीने करण्यात आले होते. शहादाकडून येणा:या वाहनांसाठी प्रकाशा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात तसेच अन्नपूर्णा माता          मंदिर प्रांगणात तर तळोदा व नंदुरबारकडून येणा:या वाहनांसाठी सद्गुरू धर्मशाळा परिसर, याहामोगी माता मंदिर परिसर, गणपती मंदिर परिसरात  भाविकांची येणारी वाहने थांबण्याची            व्यवस्था करण्यात आली होती.ट्रस्टींकडून सोयी-सुविधाभाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून केदारेश्वर, काशीविश्वेश्वर, पुष्पदंतेश्वर सद्गुरू धर्मशाळा ट्रस्टींनी मंदिरावर व्यवस्थित दर्शन घेता यावे यासाठी बॅरिकेट्स लावले होते. त्यामुळे रांगेत दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. चोरीचे प्रकार होऊ नये म्हणून वारंवार स्पीकरवर सूचना दिल्या जात होत्या. यासाठी रामचंद्र पाटील, मोहन चौधरी, हितेश वाणी, दिलीप पाटील, सुरेश पाटील, गुड्ड पाटील, रमेश साळी व पदाधिकारी उपस्थित होते.गुरव पुजा:यांचेही सहकार्यमंदिरातील गाभा:यात गर्दी   होऊ नये यासाठी मंदिर गुरव पुजा:यांनी भाविकांना दर्शन झाल्यावर लवकर बाहेर काढण्यासाठी  सुनंदा गुरव, रमेश गुरव यांनी सहकार्य केले.पोलिसांचा चोख बंदोबस्तशहादा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे, पोलीस निरीक्षक किसन पाटील, फौजदार ज्ञानेश्वर बडगुजर, प्रकाशा पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी, शहादा, नंदुरबार येथील पुरुष व महिला पोलीस, वाहतूक शाखेचे पोलीस, होमगार्ड असे 150 पोलीस तैनात करण्यात आले होते. तापी घाटावर, पुलाजवळ, मंदिर ठिकाणी, वाहनतळ आदी ठिकाणी पोलीस दिसून आले.

आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेऊन आलेले प्रशिक्षणार्थी पाण्यात तैनात केले होते. प्रकाशा येथील तापी नदीत ऋषीपंचमीला महिला स्नान करतात. सध्या तापी नदी दुथडी वाहत आहे. दुर्घटना घडू नये यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचे 20 प्रशिक्षणार्थी, ग्रामपंचायतीने दिलेल्या गणवेशासह,  लाईफ जॅकेट घालून, यांत्रिकी बोटसह तैनात करण्यात आले होते. सिताराम ङिांगाभोई हे प्रमुख होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या टीमने तापी नदीच्या पात्रात सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेर्पयत उपस्थित राहून कार्य केले.