तापीच्या पवित्र स्नानासाठी उसळली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 12:03 PM2019-09-04T12:03:29+5:302019-09-04T12:03:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : मंगळी ऋषीपंचमीनिमित्त येथील सूर्यकन्या तापी नदीच्या पात्रात स्नान करण्यासाठी महिला भाविकांनी मोठय़ा प्रमाणात हजेरी ...

The rush for the holy bath of Tapi | तापीच्या पवित्र स्नानासाठी उसळली गर्दी

तापीच्या पवित्र स्नानासाठी उसळली गर्दी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : मंगळी ऋषीपंचमीनिमित्त येथील सूर्यकन्या तापी नदीच्या पात्रात स्नान करण्यासाठी महिला भाविकांनी मोठय़ा प्रमाणात हजेरी लावली होती. केदारेश्वर, काशीविश्वेश्वर, पुष्पदंतेश्वर, संगमेश्वर, मंदिरावर दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. त्यामुळे परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते.
सविस्तर वृत्त असे की, यंदा ऋषीपंचमी मंगळवारी आल्याने ‘मंगळी ऋषीपंचमी’ म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे. याच दिवशी महिला ऋषीपंचमीच्या व्रताला प्रारंभ करतात तर काही महिला संकल्प सोडून विराम देतात.  म्हणून यावर्षी महिलांची प्रचंड गर्दी दिसून आली. ऋषीपंचमीला तापी नदीत स्नान केल्यावर पुण्य लाभते, अशी महिला भाविकांची श्रद्धा असल्याने मंगळवारी पहाटेपासूनच महिला भाविकांची गर्दी उसळली होती. नंदुरबार, तळोदा, शहादा रस्ते वाहनांच्या गर्दीने फुलून गेले होते. गुजरात व मध्य प्रदेशातूनही महिला भाविक आल्या होत्या.
तापी नदीपात्रात परंपरेनुसार तीळ व आवळ्याची भुकटी  लावून महिलांनी स्नान केले. आघाडा वनस्पती व समीधाच्या काडय़ांनी दंतन करून आयुबल हा मंत्र म्हणून प्रार्थना केली. स्नान झाल्यावर महिलांनी ब्रrावृंदाकडून अरुंधती व सप्तऋषींची कथा श्रवण केली. ऋषीपंचमीचे व्रत केल्यास पापापासून मुक्ती मिळते, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे महिलांनी ब्राrाणांकडून अरुंधती, काश्यप, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम ऋषी, जमदग्नी, वशिष्ट, अत्री या ऋषींची पूजा करून कथा श्रवण केली व सप्त कडधान्य दान केले. कथा श्रवण झाल्यावर महादेवावर अभिषेक करून घेतला. त्यानंतर श्रीक्षेत्र केदारेश्वर, काशीविश्वेश्वर, पुष्पदंतेश्वर, काशीचा ओटा, संगमेश्वर मंदिरावर दर्शनासाठी दिवसभर रांगा लागल्या होत्या. दर्शनानंतर महिलांनी मंदिर परिसरात सावलीच्या ठिकाणी एकत्र बसून फराळ केला.
यात्रेचे स्वरूप
येथील सर्वच मंदिर परिसरात पूजेचे साहित्य, नारळ, हळद-कुंकू, फुलहार उपहारगृहे, खेळणी विक्रेते, रसवंती, विविध वस्तू विक्रेते, विविध देवदेवतांचे फोटो, मूर्ती विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती. त्यामुळे मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते.
वाहन तळ नियोजन
वाहन तळाचे नियोजन योग्य पद्धधतीने करण्यात आले होते. शहादाकडून येणा:या वाहनांसाठी प्रकाशा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात तसेच अन्नपूर्णा माता          मंदिर प्रांगणात तर तळोदा व नंदुरबारकडून येणा:या वाहनांसाठी सद्गुरू धर्मशाळा परिसर, याहामोगी माता मंदिर परिसर, गणपती मंदिर परिसरात  भाविकांची येणारी वाहने थांबण्याची            व्यवस्था करण्यात आली होती.
ट्रस्टींकडून सोयी-सुविधा
भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून केदारेश्वर, काशीविश्वेश्वर, पुष्पदंतेश्वर सद्गुरू धर्मशाळा ट्रस्टींनी मंदिरावर व्यवस्थित दर्शन घेता यावे यासाठी बॅरिकेट्स लावले होते. त्यामुळे रांगेत दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. चोरीचे प्रकार होऊ नये म्हणून वारंवार स्पीकरवर सूचना दिल्या जात होत्या. यासाठी रामचंद्र पाटील, मोहन चौधरी, हितेश वाणी, दिलीप पाटील, सुरेश पाटील, गुड्ड पाटील, रमेश साळी व पदाधिकारी उपस्थित होते.
गुरव पुजा:यांचेही सहकार्य
मंदिरातील गाभा:यात गर्दी   होऊ नये यासाठी मंदिर गुरव पुजा:यांनी भाविकांना दर्शन झाल्यावर लवकर बाहेर काढण्यासाठी  सुनंदा गुरव, रमेश गुरव यांनी सहकार्य केले.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
शहादा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे, पोलीस निरीक्षक किसन पाटील, फौजदार ज्ञानेश्वर बडगुजर, प्रकाशा पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी, शहादा, नंदुरबार येथील पुरुष व महिला पोलीस, वाहतूक शाखेचे पोलीस, होमगार्ड असे 150 पोलीस तैनात करण्यात आले होते. तापी घाटावर, पुलाजवळ, मंदिर ठिकाणी, वाहनतळ आदी ठिकाणी पोलीस दिसून आले.

आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेऊन आलेले प्रशिक्षणार्थी पाण्यात तैनात केले होते. प्रकाशा येथील तापी नदीत ऋषीपंचमीला महिला स्नान करतात. सध्या तापी नदी दुथडी वाहत आहे. दुर्घटना घडू नये यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचे 20 प्रशिक्षणार्थी, ग्रामपंचायतीने दिलेल्या गणवेशासह,  लाईफ जॅकेट घालून, यांत्रिकी बोटसह तैनात करण्यात आले होते. सिताराम ङिांगाभोई हे प्रमुख होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या टीमने तापी नदीच्या पात्रात सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेर्पयत उपस्थित राहून कार्य केले.
 

Web Title: The rush for the holy bath of Tapi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.