सत्ताधारी पक्षांना जिल्हाध्यक्ष मिळेना, विरोधी पक्षातील कुजबूज थांबेना...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 12:47 IST2020-09-06T12:47:00+5:302020-09-06T12:47:10+5:30
राज्यात सत्तेत असलेल्या काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष जिल्ह्यात जिल्हाध्यक्षविना पोरके आहेत. या दोन्ही पक्षांच्या जिल्हाध्यक्षांनी पक्षांतर ...

सत्ताधारी पक्षांना जिल्हाध्यक्ष मिळेना, विरोधी पक्षातील कुजबूज थांबेना...!
राज्यात सत्तेत असलेल्या काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष जिल्ह्यात जिल्हाध्यक्षविना पोरके आहेत. या दोन्ही पक्षांच्या जिल्हाध्यक्षांनी पक्षांतर केल्यामुळे गेल्या वर्षभरापासून या दोन्ही पक्षांना नवीन अध्यक्ष मिळालेले नाहीत.
काँग्रेसमध्ये शांतताच...
नंदुरबार जिल्हा तसा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. सध्याच्या राजकारणातही अनेक घडामोडीनंतरही जिल्ह्यात दोन काँग्रेसचे आमदार असून जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद व मंत्रीपदही काँग्रेसकडे आहे. असे असतानाही संघटनात्मक बांधणीबाबत मात्र काँग्रेसमध्ये शांती शांती आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे तत्कालिन जिल्हाध्यक्ष व आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे तेव्हा काँग्रेस अचानक पोरकी झाली. पण विस्कळीत झालेला जिल्ह्यातील पक्षाची धुरा ज्येष्ठ नेते अॅड.के.सी. पाडवी यांनी सांभाळली आणि तशा स्थितीत त्यांनी विधानसभा निवडणूक व जिल्हा परिषद निवडणूकही लढवली. विशेष म्हणजे या दोन्ही निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी समाधानकारकच राहिली. राज्यात सत्ता आल्यानंतर अॅड.के.सी. पाडवी यांना आदिवासी विकास विभागाचे मंत्रीपदही मिळाले. जिल्हा परिषदेचे समीकरणही जुळवून त्यांनी अध्यक्षपद काँग्रेसला मिळवून दिले. पण संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने मात्र वर्षभरात कुठल्याही हालचाली नाहीत. दिलीप नाईक व सुभाष बुला पाटील या दोघांकडे जिल्हा कार्याध्यक्षपदाची धुरा सोपवली आहे. आता जिल्हाध्यक्षपद कुणाकडे जाईल यासाठी अंतर्गत डावपेच होत आहेत. कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता असली तरी मंत्रीमहोदय कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला देत शांत करीत आहेत. ही शांतता ते अजून किती दिवस टिकवून ठेवतील हा महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे.
राष्टÑवादीच्या बैठकाच...
काँग्रेसप्रमाणेच राष्टÑवादीचे तत्कालिन जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून राष्टÑवादी काँग्रेसलादेखील जिल्हाध्यक्ष मिळालेला नाही. पक्षात काही कार्यकर्ते अधिक सक्रीय व उत्साही आहेत. तर दुसरीकडे पक्षाकडूनही राज्य पातळीचे अनेक नेते जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. पक्ष बांधणी व कार्यक्रमांची दिशा यासंदर्भात नेते काम करीत असले तरी जिल्हाध्यक्ष नसल्याने हा पक्ष जिल्ह्यातच पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. जिल्हाध्यक्ष निवडीसाठी सध्या दोन गट सक्रीय आहेत. दोन्ही गट निष्ठावंताचा दावा करतात. पण या निष्ठेबाबत दोन्ही गट एकमेकांवर आरोप करतात. त्यामुळे खरा निष्ठावंत गट कोणता याबाबत खुद्द कार्यकर्तेच संभ्रमावस्थेत आहेत. जिल्हाध्यक्ष निवडीसंदर्भातही दोनवेळा बैठका झाल्या. दुर्दैवाने पक्ष निरीक्षकांना त्यासाठी दोन ठिकाणी वेगवेगळ्या बैठका घ्याव्या लागल्या. त्यामुळे एकेकाळी जिल्ह्यात काँग्रेसपेक्षा वरचढ ठरुन पहिल्या क्रमांकावर पोहोचलेल्या या पक्षाची अवस्था सध्या विस्कळीत झाली आहे. अध्यक्षपदाबाबत स्थानिक स्तरावर एकमत होत नसल्याने त्याचा निर्णय थेट पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर सोपविण्यात आला आहे. त्यामुळे पवार साहेब जिल्हाध्यक्षपदाचा निर्णय कधी घेतील त्याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे.
भाजपमधील कुजबूज कायम !
भाजपमध्ये ज्येष्ठ नेते डॉ.विजयकुमार गावीत व खासदार डॉ.हीना गावीत यांनी प्रवेश केल्यापासून जुने आणि नवे कार्यकर्त्यांचा वाद सुरू आहे. त्यातच राष्टÑवादीतूनच आलेले विजय चौधरी हे जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर हे वाद कायम राहत कार्यकर्ते मात्र विभागले गेले. विजय चौधरी यांची दुसऱ्यांदा जिल्हाध्यक्षपदी निवड झाली असून त्यांनी जिल्ह्यातील विविध सेल व कार्यकारिणी गठीत केली आहे. त्या कार्यकारिणीला धरुन सध्या पक्षांतर्गत कुजबूज पुन्हा सुरू झाली आहे. या पक्षातही गेल्या तीन-चार दशकांपासून निष्ठेने काम करणाºया कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त होत आहे. नवीन कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर देखील हे वाद अंतर्गत सुरू होते. पण त्यातील एका कार्यकर्त्याने जाहीरपणे पत्रक काढल्याने ते चव्हाट्यावर आले आहे. त्यामुळे या पक्षातील कुजबूज थांबण्याचे नाव घेत नाही.