भाजप विचारात घेत नसल्याने रासप उमेदवार देण्याच्या तयारीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 11:38 IST2019-04-05T11:38:02+5:302019-04-05T11:38:16+5:30
नंदुरबार : भाजपने युतीतील घटक पक्ष असलेल्या राष्टÑीय समाज पक्षाला विचारात घेत नसेल तर रासप उमेदवार उभा करेल. पक्षात ...

भाजप विचारात घेत नसल्याने रासप उमेदवार देण्याच्या तयारीत
नंदुरबार : भाजपने युतीतील घटक पक्ष असलेल्या राष्टÑीय समाज पक्षाला विचारात घेत नसेल तर रासप उमेदवार उभा करेल. पक्षात तीन उच्चशिक्षीत उमेदवारीसाठी इच्छूक असल्याची माहिती पक्षाच्या जिल्हा बैठकीत देण्यात आली.
रासपाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप सोनार यांच्या निवासस्थानी नुकतीच जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय समाज पक्षाच्या उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस सुरेखा भालचंद्र वाघ ह्या होत्या. उत्तर महाराष्ट्र सदस्य दिलीपकुमार उत्तम ढाकणेपाटील, जिल्हाध्यक्ष प्रदीप सोनार, महिला जिल्हाध्यक्षा पुष्पाताई प्रविण थोरात, आदिवासी महिला जिल्हाध्यक्ष रिना जाधव व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.